सैन्य तयार ठेवा, 2024मध्ये आपल्याला जिंकायचंय; जयंत पाटलांचं कार्यकर्त्यांना आवाहन

येत्या 2024 च्या निवडणुकीसाठी आपण सज्ज रहायला हवे, त्यासाठी आपले सैन्य तयार पाहिजे. म्हणूनच प्रत्येक बुथवर आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. प्रत्येक बुथवर राष्ट्रवादी प्लसमध्ये पाहिजे, जर आपण मायनसमध्ये जात असाल तर का मायनसमध्ये जातोय याचा अभ्यास करण्याची गरज आहे.

सैन्य तयार ठेवा, 2024मध्ये आपल्याला जिंकायचंय; जयंत पाटलांचं कार्यकर्त्यांना आवाहन
जयंत पाटील यांचा भाजपला इशाराImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 5:04 PM

सोलापूर: येत्या 2024 च्या निवडणुकीसाठी आपण सज्ज रहायला हवे, त्यासाठी आपले सैन्य तयार पाहिजे. म्हणूनच प्रत्येक बुथवर आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. प्रत्येक बुथवर राष्ट्रवादी प्लसमध्ये पाहिजे, जर आपण मायनसमध्ये जात असाल तर का मायनसमध्ये जातोय याचा अभ्यास करण्याची गरज आहे, असं सांगत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचं आवाहन केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (ncp) परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वाला आज सांगोला (sangola) येथून सुरुवात झाली. सांगोला विधानसभा मतदारसंघाचा आढावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला. माजी आमदार दिपकआबा साळुंखे यांनी विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामे व जलसंपदा विभागाच्या कामाची निवेदन सादर केली. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे आदींनी आपले विचार मांडले.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रत्येक निर्णयाला आपण पाठिंबा दिला आहे. यापुढेही द्याल याची मला खात्री आहे. दिपकआबा यांनी राष्ट्रवादीची ताकद कायम ठेवली आहे. या मतदारसंघात बदल घडवण्याचे काम आपल्याला करायचे आहे. आपण पक्ष संघटना किती गांभीर्याने घेता याचा आढावा या संवाद यात्रेत घेत असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. सांगोला तालुक्यातील जास्त गावे पाण्याखाली आली पाहिजे यासाठी दिपकआबा साळुंखे यांनी सांगितल्यावर प्रयत्न करतोय. नादुरुस्त बंधारे दुरुस्तीलाही मान्यता दिली आहे, असेही त्यांनी सांगितलं.

देशमुखांनंतर सांगोल्यात प्रभावी कामाची गरज

गणपतराव देशमुख यांना पाठिंबा देण्याचे काम अनेक वर्षे या सांगोला मतदारसंघात राष्ट्रवादीने केले आहे. त्यांनी तपस्वी काम केले आहे. मात्र त्यांच्यानंतर आता या मतदारसंघात अधिक प्रभावी काम करण्याची गरज आहे. राष्ट्रवादीचा प्रभाव कसा वाढेल यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, आदींसह पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, कार्याध्यक्ष उमेश पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे, प्रदेश उपाध्यक्षा जयमालाताई गायकवाड, भगीरथ भालके,जिल्हा प्रभारी सुरेश घुले आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सांगोल्यातील सर्व गावांना पाणी मिळावे

गणपतआबा देशमुख यांनी वर्षांनुवर्षे या सांगोल्याचे प्रतिनिधीत्व केले आहे. या दुष्काळग्रस्त भागात पाणी पोहोचवावे यासाठी आबांनी प्रयत्न केला. कालांतराने या भागात टेंभूचे पाणी आले, म्हैसाळचे पाणी आले. आज आबा हयात नाहीत मात्र दीपकआबा साळुंके या भागात अधिकचे पाणी यावे यासाठी प्रयत्नशील राहतात. महाविकास आघाडी सरकार आल्यापासून त्यांचा नेहमीच पाठपुरावा असतो. सांगोल्याच्या सर्व गावांना पाणी मिळावे अशी त्यांची मागणी आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात या भागासाठी विशेष बैठक घेतली जाईल व या भागातील जास्तीत जास्त मागण्या दीपक आबांच्या उपस्थितीत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहिल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

संबंधित बातम्या:

भगवा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी फक्त भाजपवर, हिंदुत्वावरून फडणवीसांनी शिवसेनेला पुन्हा डिवचलं

मी पाटील आहे, संजय राऊतांपेक्षा भयानक बोलू शकतो, पण…; चंद्रकांत पाटलांचा इशारा

पंतप्रधान मोदींनी जाहीर सभेत कार्यकर्त्याचे पाय धरले! नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.