Job Alert | पुणे जिल्ह्यात टपाल विभाग नियुक्त करणार विमा एजंट, 7 सप्टेंबरला थेट मुलाखती, काय आहे पात्रता?

टपाल विभागाने (Postal Department) पुणे जिल्ह्यासाठी रोजगाराच्या संधी उलपब्ध करून दिल्या आहेत. टपाल जीवन विमा विभागात (Postal Life Insurance Department) एजंट (Agent) म्हणून या काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी थेट मुलाखती (Direct Interview) ठेवण्यात आल्या आहेत.

Job Alert | पुणे जिल्ह्यात टपाल विभाग नियुक्त करणार विमा एजंट, 7 सप्टेंबरला थेट मुलाखती, काय आहे पात्रता?
टपाल विभागात विमा एजंट पदासाठी भरती
Follow us
| Updated on: Aug 25, 2021 | 4:20 PM

पुणे : कोरोना (Corona) काळात लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेकांचा रोजगार हिरावला गेला. सर्व आर्थिक व्यवहार बंद असल्याने अनेकांवर आर्थिक संकटही ओढावलं होतं. पण आता अनलॉकमध्ये सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. अशात आता टपाल विभागाने (Postal Department) पुणे जिल्ह्यासाठी रोजगाराच्या संधी उलपब्ध करून दिल्या आहेत. टपाल जीवन विमा विभागात (Postal Life Insurance Department) एजंट (Agent) म्हणून या काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी थेट मुलाखती (Direct Interview) ठेवण्यात आल्या आहेत. (The postal department is recruiting for the post of insurance agent in Pune district)

टपाल विभागाकडून पुणे शहर आणि जिल्ह्यात टपाल विमा एजंट म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या 7 सप्टेंबरला सकाळी 10 ते संध्याकाळी 7 या वेळेत थेट मुलाखती घेण्यात येणार आहे.

कुठे होणार मुलाखत?

टपाल जीवन विमा, ग्रामीण टपाल जीवन विमा एजंट पदाच्या थेट मुलाखतीसाठी जंगली महाराज रस्ता इथं असलेल्या डाकघर अधीक्षक, पुणे ग्रामीण विभाग या कार्यालयात सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र, पॅन कार्ड, आधार कार्डसह अन्य संबंधित कागदपत्र घेऊन उपस्थित रहायचं आहे.

काय आहे पात्रता?

टपाल विभागातल्या विमा एजंटसाठी 18 वर्षांपासून ते 50 वर्षांपर्यंत कुणीही मुलाखत देऊ शकतं. बेरोजगार, स्वयंरोजगार व्यक्ती, माजी जीवन विमा सल्लागार, कोणत्याही जीवन विमा कंपनीचे माजी एजंट, माजी सैनिक, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ कर्मचारी, निवृत्त शिक्षक, स्वयंसहायता समूह पदाधिकारी इत्यादी टपाल विमा एजंटसाठी पात्र आहेत.

मोबदला कसा मिळणार?

थेट एजंट म्हणून नियुक्तीनंतर टपाल विभागाने निर्धारित केलेले कमिशन प्रोत्साहनपर भत्ता नियमितपणे देण्यात येईल. नियुक्त झालेल्या उमेदवारांना टपाल विभागातर्फे अंतरिक प्रशिक्षण दिलं जाईल.

संबंधित बातम्या :

IB Recruitment 2021: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 527 पदांवर भरती, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर

‘महाज्योती’ संस्था देणार मागासवर्गीय विद्यार्थ्यांना JEE, NEET परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण! असा करा अर्ज

MPSC तर्फे संयुक्त पूर्व परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट; परीक्षा ‘या’ तारखेला होणार, ॲडमिट कार्ड जारी

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.