खेड शिवापूर टोलबाबत मोठा निर्णय, कोण जिंकले? प्रशासक की आंदोलक?

शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीने शिवापूर टोलनाका स्थलांतरित करण्यासाठी २ एप्रिल २०२३ रोजी बंद पुकारला होता. परंतु जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामुळे हा बंद तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे.

खेड शिवापूर टोलबाबत मोठा निर्णय, कोण जिंकले? प्रशासक की आंदोलक?
पुणे सातारा महामार्गावर टोल नाकाImage Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us
| Updated on: Mar 28, 2023 | 9:59 AM

विनय जगताप, भोर, पुणे : पुणे सातारा महामार्गावरील खेडशिवापूर टोल नाका विषयात जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्ती केलीय. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात जिल्हाधिकारी राजेश देशुख, महामार्ग प्रशासनाचे अधिकारी, आमदार संग्राम थोपटे आणि शिवापूर टोल नाका हटाव कृती समितीचे सदस्य यांच्यात पार बैठक पडली. बैठकीच्या सुरुवातीलाच शिवापूर टोलनाक्यामुळे भोर, वेल्हा, हवेली या तालुक्यांमधील नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत कृतीसमितीने आक्रमकपणे भूमिका मांडली. यावेळी कृती समितीच्या आक्रमक भूमिकेपुढे टोल प्रशासन अखेर माघार घेत निर्णय जाहीर केला.

काय झाली चर्चा

पुणे सातारा महामार्गावरील खेडशिवापूर टोल नाका विषयात जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्ती केलीय. बैठकीत जिल्हाधिकारी राजेश देशमुख, महामार्ग प्रशासनाचे अधिकारी, आमदार संग्राम थोपटे आणि शिवापूर टोल नाका हटाव कृती समितीचे सदस्य यांच्यात चर्चा झाली.यावेळी कृती समितीच्या आक्रमक भूमिकेपुढे टोल प्रशासनाने माघार घेतली. प्रशासनाने आजपासून टोल माफीचा निर्णय जाहीर केलाय. स्थानिक नागरिकांना ओळखपत्र दाखवल्यानंतर त्यांना टोल माफी होणार आहे. त्यामुळं 2 एप्रिलला टोलनाका हटाव आणि स्थानिकांना टोलमाफी द्यावी या मागणीसाठी करण्यात येणारं शिवापूर टोलनाक्यावरील आंदोलन तात्पुरत स्थगित करण्यात आलय.भोर विधानसभा मतदार संघांचे आमदार संग्राम थोपटें आणि कृती समितीचे निमंत्रक माऊली दारवटर यांनी ही माहिती दिलीय.

हे सुद्धा वाचा

टोलनाकाचे स्थलांतर व्हावा

शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीने शिवापूर टोलनाका स्थलांतरित करण्यासाठी २ एप्रिल २०२३ रोजी पुकारलेल्या जनआंदोलनामुळे ही बैठक घेतली. कृती समितीच्या वतीने माऊली दारवटकर यांनी टोलनाका हा PMRDA च्या हद्दीत येत असून वाढते नागरिकीकरण आणि औद्योकीकरण या भागात झाले आहे. यामुळे टोलनाका या ठिकाणावरून स्थलांतरित होण्यासाठी सर्व पक्षीय आंदोलने सन २०११ पासून येथे झालेली आहेत. या टोलनाक्याचे स्थलांतर होणे आवश्यक असल्याची आग्रही भूमिका त्यांनी मांडली.

काय म्हणतात अधिकारी

टोल प्रशासनाचे अधिकारी अमित भाटिया यांनी “टोलनाका स्थलांतर करण्यास आमची तयारी आहे. मात्र याबाबत NHAI ने निर्णय घ्यावा” अशी भूमिका घेतली. यानंतर जिल्हाधिकारी यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आंदोलन करू नये असे आवाहन कृती समितीला केले. यावेळी बोलताना “टोलनाका स्थलांतराचा प्रस्ताव आता मी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाकडे पाठवणार आहे. याबाबत संबंधित मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली असून ३० मार्च २०२३ रोजी पुढील बैठकीचे नियोजन करण्यात येईल” असे जिल्हाधिकारी यांनी जाहीर केले.यानंतर जोपर्यंत टोलनाका स्थलांतराचा निर्णय होत नाही तो पर्यंत स्थानिकांना टोलमाफी देण्याची मागणी टोल प्रशासनाने मान्य करत एक पाऊल मागे घेतले. त्यामुळे कृती समितीने जनआंदोलन तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

आजच्या बैठकीमुळे भोर, वेल्हा, मुळशी, हवेली, पुरंदर या तालुक्यातील नागरिकांना अधिकृत ओळखपत्र दाखवून टोलनाक्यावरून टोल मधून सूट मिळणार आहे. मात्र याबाबत निर्णय झाला असला तरी टोलनाका स्थलांतराबाबत NHAI ने लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास कृती समिती कोणत्याही क्षणी आंदोलन करण्यास तयार आहे, अशी भूमिका शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीने जाहीर केली आहे.

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.