बोगस डॉक्टरने काढलेल्या महिलांच्या ८० अश्लील क्लिप व्हायरल, अखेर असा सापडला
बोगस डॉक्टराचा महिलांशी अश्लील चाळे अन् संभाषण करण्याचा प्रकार उघड झाला आहे. महिलांकडून आलेल्या पत्रानंतर या प्रकरणाची चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे त्याने डॉक्टरीचा व्यवसाय चालवण्यासाठी सोशल मीडियात जाहिराती केल्या होत्या.
भूषण पाटील, कोल्हापूर : डॉक्टराची पदवी बोगस अन् त्यात महिलांशी अश्लील चाळे करण्याचा प्रकार उघड झाला आहे. परंतु या प्रकरणात बदनामीच्या भीतीने अजून तक्रार दाखल झालेले नाही. त्या बोगस डॉक्टराने तब्बल ८० व्हिडिओ क्लिप तयार केल्या आहेत. या क्लिममध्ये तो महिलांशी अश्लील चाळे अन् संभाषण करताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्याने डॉक्टरीचा व्यवसाय चालवण्यासाठी सोशल मीडियात जाहिराती केल्या होत्या. त्या जाहिराती पाहून अनेक रुग्ण त्यांच्याकडे आले होते. कोल्हापूरच्या मुरगुडमध्ये हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. मुरगुड पोलीस, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक पत्रकारांना महिलांनी यासंदर्भात निनावी पत्र लिहिली आहे.
काय आहे प्रकार
कोल्हापुरात एक डॉक्टराने व्यवसाय सुरु केला. त्याच्याकडे पदवी नाही. त्यानंतर एक नाही तर दोन गंभीर गुन्हे त्या कथिक डॉक्टराने केले. बोगस डॉक्टर त्याच्याकडे येणाऱ्या महिला रुग्णांशी अश्लील चाळे करत होता. या प्रकाराचे मोबाईलमध्ये शुटिंग करत होता. त्यानंतर हे सर्व शुटिंग आपल्या लॅपटॅपवर ठेवत होता. तब्बल अश्लील चाळे करतानाच्या 80 क्लिप त्याने लॅपटॅपमध्ये ठेवल्या होत्या.
कसा झाला उघड प्रकार
संबंधित डॉक्टरचा लॅपटॉप खराब झाला. तो लॅपटॉप दुरुस्तीसाठी दिल्यानंतर या व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यानंतर परिसरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. यासंदर्भात अनेक महिलांनी निनावी पत्र पाठवली. कोल्हापूरमधील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि पोलिसांना ही पत्र पाठवली गेली. यामुळे दबक्या आवाजातील चर्चेला ऊत आला आहे. त्या बोगस डॉक्टराने वैद्यकीय व्यवसायाच्या आडून लांच्छनास्पद प्रकार केला आहे. यामुळे व्यवसायात प्रामाणिकपणे काम करणार्या वैद्यकीय क्षेत्राला कलंक लागला आहे.
त्या डॉक्टराला शिकवण्याची मागणी
अश्लील चित्रण करून ते जतन करून ठेवणार्या त्या बोगस डॉक्टराला धडा शिकवणे गरजेचे आहे, अशी मागणी महिलांनी पत्रातून केली आहे. या डॉक्टरच्या कृत्याला पाठबळ देणार्यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा या पत्रातून व्यक्त केली आहे. दरम्यान, याप्रकारासंदर्भात कोणतीही तक्रार आली नसल्याचे मुरगूड पोलिसांनी सांगितले.
कोल्हापूर-मुंबई सेवा सुरु होत असताना विमानतळ भूसंपादनाचा वाद चिघळणार…वाचा सविस्तर