कोपर्डी अत्याचार प्रकरणातील धक्कादायक बातमी; आरोपीने उचललं टोकाचं पाऊल

कोपर्डी अत्याचार प्रकरणाशी संबंधित एक बातमी आहे. या घटनेतील आरोपींना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. पण त्यांना फाशी झालेली नाही. मात्र, त्यापूर्वीच यातील आरोपीने अत्यंत टोकाचं...

कोपर्डी अत्याचार प्रकरणातील धक्कादायक बातमी; आरोपीने उचललं टोकाचं पाऊल
yerwada jail puneImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 10, 2023 | 10:40 AM

पुणे | 10 सप्टेंबर 2023 : कोपर्डी प्रकरणातील एक महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी आहे. या प्रकरणातील आरोपीने तुरुंगातच आत्महत्या केली आहे. आरोपीने तुरुंगातच जीवन संपवल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच आता कोपर्डी प्रकरणाचं काय होणार? याचीही चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, राज्यातील तुरुंगात आरोपीने आत्महत्या करण्याची ही दुसरी घटना आहे. या आधी दोनच दिवसापूर्वी रुपल ओगरे या एअर होस्टेसच्या मारेकऱ्याने पोलीस कोठडीत आत्महत्या केली होती. त्यानंतर आज पुन्हा ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

कोपर्डीप्रकरणातील आरोपीला पुण्याच्या येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं होतं. त्याने आज सकाळी तुरुंगातच जीवन संपवलं. त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत मिळाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत. आरोपीने कशाच्या सहाय्याने जीवन संपवलं? इतक्या वर्षानंतर एवढं टोकाचं पाऊल का उचललं? याचाही पोलीस शोध घेत आहेत.

काय आहे प्रकरण?

13 जुलै 2016 रोजी कोपर्डीत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेची माहिती समोर येताच संपूर्ण देश हादरून गेला होता. या प्रकरणानंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले होते. अनेक ठिकाणी निदर्शन करण्यात आली होती. तर मेणबत्ती मार्चही काढण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात होती.

हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाची अहमदनगर जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली होती. यावेळी कोर्टाने आरोपीला फाशीची शिक्षा दिली होती. यावेळी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारच्यावतीने पीडितेची बाजू मांडली होती.

भावाला नोकरी

दरम्यान, कोपर्डीतील पीडित कुटुंबासाठी राज्य सरकारने सकारात्मक पावलं उचलली होती. पीडितेच्या भावाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोकरी दिली होती. कोपर्डीतील निर्भयाच्या भावाला महसूल विभागात नोकरी देण्यात आली होती. तो 2019मध्ये कर्जतच्या तहसीलदार कार्यालयात शिपाईपदावर रूजू झाला होता.

संभाजीराजे, उदयनराजेही आक्रमक

कोपर्डीतील घटना उघडकीस आल्यानंतर छत्रपती संभाजीराजे आणि खासदार उदयनराजे भोसले अधिक आक्रमक झाले होते. त्यांनी आरोपींना शिक्षा करण्यासाठी बराच पाठपुरावा केला होता. त्यांनी कोपर्डीत जाऊन पीडीत कुटुंबीयांची भेट घेतली होती. प्रकाश आंबेडकर असो की रामदास आठवले राज्यातील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी कोपर्डीतील पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं होतं.

बरं झालं फाशी घेतली

आता दुसऱ्या आरोपीनेही फाशी घेतली. बरं झालं त्याने फाशी घेतली असंच मला म्हणावं लागेल. खरंतर त्यांना कायद्यानुसार फाशी व्हायला हवी होती, असं राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.