ललित पाटील मदत करणाऱ्या मोठ्या नावांचा खुलासा करणार
Lalit Patil Drug Case | ललित पाटील ड्रग्स प्रकरणात सर्व बाजूने पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. ललित पाटील याला अटक केल्यानंतर त्यांना मदत करणारे सर्वच रडारवर आले आहेत. आता ललित पाटील त्याला मदत करणाऱ्यांची नावे चौकशीत देणार आहे. त्याने अटक झाल्यानंतर नावे सांगणार असल्याचे म्हटले होते.
योगेश बोरसे, पुणे | 3 नोव्हेंबर 2023 : पुणे येथून ससून रुग्णालयातून फरार झालेला ललित पाटील येरवडा कारागृहातील कैदी होता. 2 ऑक्टोबर रोजी तो फरार झाला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला पंधरा दिवसांनी अटक केली. त्यावेळी ललित पाटील याने आपण पळाले नाही तर आपणास पळवले गेले होते. आपण आपणास पळवण्यास मदत करणाऱ्या सर्व लोकांची नावे सांगणार?, असे अटक झाल्यानंतर म्हटले होते. आता ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात आला असून त्याला मदत करणाऱ्यांची नावे उघड करण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांनी त्याला मदत कोण केली? या पद्धतीने चौकशी सुरु केली असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड होणार आहे.
ललित पाटील श्रीलंकेत जाणार होता
ललित पाटील ससूनमधून पसार झाल्यानंतर श्रीलंकेत पळून जाण्याच्या तयारीत होता. पुणे पोलिसांच्या तपासात ही माहिती समोर आली आहे. ललित पाटील सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. तसेच ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे या दोघांना चौकशीसाठी मुंबई पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. न्यायालयाने बुधवारी ललित पाटील याच्यासह तिघांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
मैत्रिणींकडून २५ लाख घेतले अन्…
ललित पाटील फरार झाल्यानंतर त्याने काय केले? तो कुठे गेलो? त्याला कोणी मदत केली? या प्रश्नांची उत्तर पुणे पोलिसांच्या चौकशीतून मिळणार आहे. त्यावेळी त्याला ससूनमधून पळण्यास कोणी भाग पाडले? ती नावे तो सांगणार आहे. यामुळे पुणे पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. ललित ससूनमधून पळाल्यानंतर नाशिक शहरात गेला होता. त्या ठिकणी त्याच्या मैत्रिणींकडून २५ लाख रुपये घेतले. त्यानंतर तो श्रीलंकेला जाण्याच्या तयारीत होता. श्रीलंकेत जाण्यासाठी तो चेन्नईत गेला होता. चेन्नईमार्गे श्रीलंकेला जाण्याच्या तयारीत असताना मुंबई पोलिसांनी त्याला पकडले होते.