AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘लोक माझे सांगाती’ मधील उद्धव ठाकरे यांच्या उल्लेखावर सुप्रिया सुळे यांचे भाष्य, म्हणाल्या…

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' मधील उद्धव ठाकरे यांच्या उल्लेखावर पुन्हा राजकीय चर्चा सुरु झाली आहे. यासंदर्भात पुण्यात देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी वक्तव्य केले. त्यावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले.

'लोक माझे सांगाती' मधील उद्धव ठाकरे यांच्या उल्लेखावर सुप्रिया सुळे यांचे भाष्य, म्हणाल्या...
| Updated on: May 19, 2023 | 11:27 AM
Share

अभिजित पोते, पुणे : भाजप प्रदेश कार्यकारिणीची गुरुवारी पुण्यात बैठक झाली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकातील उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या १० वाक्यांचे जाहीर वाचन केले. सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आठ मागण्या वाचून दाखवल्या. देवेंद्र फडणवीस यांच्या या भाषणाची चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. विशेषत: शरद पवार यांनी त्यांच्या आत्मकथेत उद्धव ठाकरे यांच्याबद्दल लिहिलेल्या मजकूरावरुन राजकीय चर्चा रंगली आहे. त्यावर शरद पवार यांच्या कन्या अन् खासदार सुप्रिया सुळे यांनीही भाष्य केले आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे जांभूळवाडी तलावाची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी याच तलावात दुर्गंधीमुळे हजारो मासे झाले होते. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पुणे महापालिका आणि पाटबंधारे विभागाने तातडीने बैठक घेऊन प्रश्न सोडवला पाहिजे. महापालिकेत सध्या अधिकारीच कारभार चालवत आहे. यामुळे या निवडणूक लवकर घेतली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. हा प्रकार म्हणजे महापालिका हलगर्जीपणा आहे बाकी काही नाही. या तळ्यातील मासे कोणीही खाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय म्हणाल्या

देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात काल उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात शरद पवार यांनी लिहिलेली दहा वाक्य वाचून दाखवली. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, लोक माझे सांगाती हे पुस्तक नीट वाचा. या राजकीय आत्मकथेत १०० गोष्टी चांगल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल या फक्त नोट्स काढल्या आहेत. फडणवीस यांनी टीआरपी कसा वाढवावा हे शरद पवार कडून शिका असे म्हटले होते. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, फडणवीस यांनी पवार यांना दिलेली ही कॉम्प्लेमेंट आहे.

उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची ती दहा वाक्य

लोक माझे सांगाती पुस्तकामधील फडणवीस यांनी वाचली दहा वाक्य…

  1. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या संवादामधील सहजता उद्धव ठाकरे सोबत नव्हती.
  2. उद्धव ठाकरे यांना राज्यातील घडामोडींची बितंबातमी माहीत नव्हती. जी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे असायला पाहिजे होती.
  3. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केल्याने शिवसेनेत उद्रेक होईल याची कल्पनाच आम्हाला आली नव्हती.
  4. उद्धव ठाकरे यांचे कुठे काय घडतं आहे याबर बारीक लक्ष नसायचे.
  5. उद्धव ठाकरे यांच्यांत उद्या काय घडतं आहे याचा अंदाज घ्यायची क्षमता नव्हती.
  6. उद्धव ठाकरे यांच्यामध्ये राजकीय चातुर्य असायला हवं होतं त्याची कमतरता आम्हाला जाणवत होती.
  7. उद्धव ठाकरे यांचा राजकीय अनुभव कमी पडला. जे सगळं घडत होतं. ते टाळता येणं त्यांना जमलं नाही.
  8. महाविकास आघाडी सरकार कोसळताना पहिल्याच टप्प्यात त्यांनी माघार घेतली. संघर्ष न करता माघार घेतली.
  9. उद्धव ठाकरे प्रशासनाच्या संपर्कात ऑनलाईन पद्धतीने होते. दुसरीकडे राजेश टोपे, अजितदादा आणि इतर मंत्री मात्र प्रत्यक्ष संपर्कात होते.
  10. उद्धव ठाकरे यांचे फक्त दोनवेळा मंत्रालयात जाणे हे आमच्या पचनी पडणारे नव्हते.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.