Pune News : पुणे मनपाच्या लॉटरीत कोणी जिंकली कार, बाईक कोणाला मिळाले लॅपटॉप

Pune News : पुणे महानगर पालिकेने शहरातील प्रत्येक व्यक्तीला बक्षीस जिंकण्याची संधी दिली. पाच चारचाकी, दुचाकी, लॅपटॉप अन् स्मार्ट फोन जिंकण्याची संधी आहे. नेमकी काय आहे ही योजना...

Pune News : पुणे मनपाच्या लॉटरीत कोणी जिंकली कार, बाईक कोणाला मिळाले लॅपटॉप
pune mahanagarpalikaImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 22, 2023 | 4:21 PM

पुणे | 22 ऑगस्ट 2023 : पुणे तेथे काय उणे असे का म्हटले जाते, हे नेहमी सिद्ध झाले आहे. पुणेकरांच्या प्रत्येक गोष्टी वेगळ्या असतात. पुणेकरांच्या सवयी, खाद्यपदार्थ, संस्कृती, खेळ राज्यात सहज पोहचतात. पुणे महानगरपालिकेने आपले वेगळेपण या पद्धतीने सिद्ध केले आहे. मनपाने पुणे शहरातील नागरिकांसाठी कोट्यवधी रुपये जिंकण्याची बक्षिसे जिंकण्याची संधी दिली. या संधीची सोडत काढण्यात आली. त्यात पाच जणांना कार जिंकली. काही जणांना दुचाकी मिळाली तर काहींना लॅपटॉप मिळाले.

काय होती योजना

पुणे महानगरपालिकेने शहरासाठी एक योजना आणली. मनपाचे उत्पन्न वाढवणे आणि पुणेकरांना वेळेवर कर भरण्यास प्रोत्सहान देण्यासाठी ही योजना होती. त्यासाठी कोट्यावधी किंमतीची बक्षिसे मनपाने जाहीर केली. कार, दुचाकी, लॅपटॉप, स्मार्ट फोन तसेच इतर शेकडो बक्षिसांचा समावेश त्यात होता. या लॉटरीची सोडत काढण्यात आली. त्यात पाच जणांना पेट्रोल कार मिळाली. १५ जणांनी ई-बाईक मिळाली. १५ जणांना लॅपटॉप तर १० जणांना स्मार्टफोन मिळाले.

हे सुद्धा वाचा

किती जण ठरले विजेते

पुणे मनपाच्या या लॉटरीसाठी 45 जण भाग्यवान विजेते ठरले. दीपाली ठाकुर, प्रियंका मुखेकर, माणिक ढोने, आदित्य कुमार आणि गणेश कळमकर यांनी कार जिंकली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा निकाल जाहीर केला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मनापाच्या योजनेचे कौतूक केले. यावेळी मनपा आयुक्तांसह अनेक अधिकारी उपस्थित होते.  31 जुलैपर्यंत, दंड न भरता कर भरणारे यासाठी पात्र ठरले होते. या योजनेमुळे मनपाच्या उत्पन्नात दहा टक्के वाढ झाली. या योजनेमुळे नागरिकांनाही फायदा मिळाला आणि मनापाच्या तिजोरीत भर पडली आहे.

गणेश कळमकर यांनी कार केली परत

गणेश कमळकर यांनी लकी ड्रॉमध्ये मिळालेली कार परत केली आहे. या कारऐवजी मनपाने एक रुग्णावहिका घ्यावी आणि तिचा वापर शहरातील रुग्णांसाठी करावा, असे कळमकर यांनी म्हटले आहे.कळमकर यांच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतूक केले जात आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.