पळून जाऊन लग्न करण्याचे फॅड, विवाहित महिलांनीही थाटला दुसरा संसार

Pune News | पुणे जिल्ह्यातील भोरमध्ये लग्नसंदर्भात आश्चर्यकारक आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीमुळे पालकवर्गात चिंता निर्माण झाली आहे. भोर तालुक्यात पळून जाऊन लग्न करण्याचे प्रमाण वाढले असल्याचे पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झाले आहे.

पळून जाऊन लग्न करण्याचे फॅड, विवाहित महिलांनीही थाटला दुसरा संसार
Follow us
| Updated on: Jan 02, 2024 | 2:22 PM

विनय जगताप, भोर, पुणे, दि. 2 जानेवारी 2024 | भारतीय संस्कृतीत लग्न म्हणजे दोन जिवांचे मिलन म्हटले जाते. लग्नासाठी शास्त्रोक्त पद्धत भारतीय परंपरेत आहे. परंतु काळाप्रमाणे बऱ्याच गोष्टी बदलत आहेत. कॉलेज किंवा इतर ठिकाणी ‘नजरे से नरज मिली’ असे होऊन प्रेम झाले अन् नंतर लग्न झाले, असे होत आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील आश्चर्यकारक आकडेवारी समोर आली आहे. भोर तालुक्यात पळून जाऊन लग्न करण्याचे प्रमाण वाढले आहे. या पद्धतीने लग्न करण्यात विवाहित महिलाही आहे. प्रेम प्रकरणाच्या वाढलेल्या या प्रकारामुळे पालक वर्ग चिंतेत आहे.

विवाहित महिलांनी थाटला दुसरा संसार

पुण्याच्या भोर तालुक्यातल्या राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत वर्षभरात 55 जणांनी पलायन केल्याची आकडेवारी समोर आली आहे. यात 17 तरुण आहेत. त्यात विवाहित महिलांचा समावेश आहे. तरुण मुलींसह 41 महिला पळून गेल्या आहेत. तालुक्यातील प्रेमवीरांच्या या घटनांमुळे पालकवर्ग चिंतेत आहे. गेल्या वर्षभरात पळून जाऊन लग्न करण्याचा सपाटा सुरू असल्याबद्दल समाजातही चिंता व्यक्त केली जात आहे. अल्पवयीन मुलांना फूस लावून पळवण्याचे प्रकार समोर आले आहे.

नोंद नसणाऱ्यांची संख्या

पळून जाऊन लग्न करणाऱ्यांमध्ये नोंद नसणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पोलिसांकडील आकडेवारीनुसार 31 डिसेंबरपर्यंत 15 पुरुष, 18 वर्षापुढील 22 तरुणी, विवाहित असलेल्या 19 महिला घरातून निघून गेल्या होत्या. तसेच 6 अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले होते. राजगड पोलिसांना बेपत्ता झालेल्या जवळपास सर्वच व्यक्तींना शोधण्यात यश आले आहे. यामध्ये प्रेम प्रकरणातून पळून जाणाऱ्या तरुण – तरुणींची संख्या अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे सुद्धा वाचा

पळून जाऊन लग्न करण्याचे प्रकार चित्रपट आणि मालिकांमुळे वाढत असल्याचा आरोप समाजातील लोकांकडून केला जात आहे. मुले-मुली एकच समाजाचे असतील तर या लग्नास विरोध होत नाही, परंतु दोन वेगळ्या समाजातील युवक-युवती असतील तर यामुळे तणाव निर्माण होतो.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.