महाराष्ट्रात हुडहुडी वाढणार, आयएमडीकडून महत्वाचे अपडेट

Weather Update Pune | राज्यात आता सर्वत्र थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. राज्यातील अनेक शहराचे तापमान घसरले आहे. यामुळे रात्री लागणारे एसी, कुलर बंद झाले आहेत. राज्यात येत्या चार दिवसांत हुडहुडी वाढणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला.

महाराष्ट्रात हुडहुडी वाढणार, आयएमडीकडून महत्वाचे अपडेट
Winter
Follow us
| Updated on: Oct 29, 2023 | 8:59 AM

अभिजित पोते, पुणे | 29 ऑक्टोंबर 2023 : राज्यात यंदा मॉन्सूनने सरासरी गाठली नाही. चार वर्षांनंतर यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. आता ऑक्टोबर महिना संपण्यास दोन, तीन दिवस असताना राज्यातील अनेक शहरांचे तापमान घसरले आहे. राज्यातील सर्वात हॉट सीट म्हणून ओळख असलेल्या जळगाव शहराचे तापमान घसरले आहे. जळगावात सर्वात कमी तापमानाची नोंद ११.४ अंश सेल्सिअस झाली आहे. जळगावपेक्षा महाबळेश्वरचे तापमान जास्त आहे. महाबळेश्वरमध्ये किमान तापमान १६.५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. सर्वात जास्त तापमान रत्नागिरी शहराचे होते. रत्नागिरीत कमाल तापमान ३६.७ अंश सेल्सिअस होते. आता राज्यातील तापमानात घसणार होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पुणे शहरात हुडहुडी वाढणार

राज्यातील अनेक शहरांत गेल्या पाच-सहा दिवसांपासून तापमानाचा किमान पारा घसरत आहे. परंतु दिवसा उन्हाचे चांगलेच चटके बसत आहेत. रात्री तापमानात घट झाली आहे. रात्रीच्या वेळेस बोचरी थंडी पडत आहे. पहाटे चार ते सात वाजेदरम्यान वातावरणात चांगलाच गारवा जाणवू लागला आहे. बदलत्या वातावरणाचा परिणाम आरोग्यावर होणार आहे. यामुळे स्वेटर, जॅकेटचा वापर होऊ लागला आहे. पुढील चार दिवसांत पुण्यात गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. राज्यातील तापमानात घसरण होणार असल्याचा अंदाज आहे. गेल्या 3-4 दिवसांत राज्यातील अनेक शहरातील कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे.

हे सुद्धा वाचा

मुंबईच्या तापमानात घसरण

मुंबई शहराचे किमान तापमान घसरलेले आहे. मुंबईचे तापमान २४.२ अंशावर तर कमाल तापमान ३५.६ अंशावर आले आहे. तापमानात घसरण झाल्यामुळे मुंबईकरांना सकाळी, सकाळी गारवा जाणवत आहे. पुणे शहराचे तापमान १४ अंशावर आले आहे. राज्यात जळगावात तापमानचा नीच्चांक होता. जळगाव शहराचे कमाल तापमान ३४.७ तर किमान तापमान ११.४ अंश सेल्सिअस होते. जळगावात एप्रिल, मे महिन्यात ४२ ते ४४ अंश सेल्सिअसवर तापमान जात असते. त्यामुळे जळगावला राज्यातील हॉट सिटी म्हटले जाते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.