मोठी बातमी ! 2024 पर्यंत महाविकास आघाडी टिकणार नाही; कुणी केला मोठा दावा?

भाजप सर्व ठिकाणी निवडणूक जिंकत आहे. 25-30 वर्षात मुबंईचा विकास झाला नाही. शिंदे-फडणवीस सरकार कायापालट करत आहे. भाजप सक्षम पर्याय आहे.

मोठी बातमी ! 2024 पर्यंत महाविकास आघाडी टिकणार नाही; कुणी केला मोठा दावा?
maha vikas aghadiImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 18, 2023 | 1:12 PM

पुणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. त्यासाठी महाविकास आघाडीने जोर बैठकाही सुरू केल्या आहेत. महाविकास आघाडी मजबूत असल्याचं आघाडीच्या नेत्यांकडूनही सांगितलं जात आहे. मात्र, 2024 पर्यंत महाविकास आघाडी टिकणार नाही. महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या उडतील, असा दावाही करण्यात आला आहे. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी हा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

प्रवीण दरेकर मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. ठाकरे गटाने आधी एकत्र राहावं. 2024 पर्यंत ठाकरेंच्या ठिकऱ्या उडालेल्या असतील. 2024 पर्यंत महविकास आघाडी टिकणार नाही. महाविकास आघाडीत अनेक मतभेद आहेत. उगाच ठाकरी पॅटर्न राबवून काही फायदा होणार नाही, असा दावा प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

अध्यक्ष निर्णय घेण्यास सक्षम

आतापर्यंत संजय राऊत जिथं जिथं गेले, त्या ठिकाणी गेले, त्यांनी यश मिळवले आहे. कर्नाटकात बघा काय झालं, असा चिमटा काढतानाच जनतेच्या आशीर्वादावर भाजप सुरू आहे. उद्धव ठाकरे यांना जनाधार काय आहे हे आपण पाहिलं आहे. काही लोक दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सरकार सक्षम आहे, असंही त्यांनी सांगितलं. तसेच 16 आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष कायद्याच्या चौकटीत निर्णय घेतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

एक हाती सत्ता येईल

भाजप सगळे कार्यक्रम रणनीती करूनच करत असते. त्यामुळे लोकप्रतिनिधींचा आढावा घेतला जातो. यावेळी निवडणुकांसह इतर चर्चा होतात. हीच परंपरा आहे. त्यानंतर कार्यकारिणी निर्णय घेते, असं दरेकर यांनी सांगितलं. भाजप सर्व ठिकाणी निवडणूक जिंकत आहे. 25-30 वर्षात मुबंईचा विकास झाला नाही. शिंदे-फडणवीस सरकार कायापालट करत आहे. भाजप सक्षम पर्याय आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत आमच्या युतीची एकहाती सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महापालिका आमच्याच ताब्यात येईल

दरम्यान, भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनीही मुंबई महापालिका आम्हीच जिंकणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. भाजप प्रदेश कार्यकारणी सतत चालते. राज्यात वेगवेगळ्या बैठका होत असतात. कुठले कार्यक्रम राबवले आणि काय राबवण्यात येतात याचा आढावा घेतला जातो. बैठकीचा आणि कर्नाटकातील पराभवाचा काहीच संबंध नाही. कर्नाटक पराभवानंतर बैठक होतेय इतकंच. निवडणुकीची तयारी बैठकीत होत नसते, असं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं.

ठाकरे गटाच्या बैठकी, दौरे होउद्या. पण राज्यात भाजपचेच सरकार येणार. देशात या अगोदरही तिसरे आघाडी झाली होती. पण पंतप्रधान पदावरून वाद होतो अन् आघाडी फुटते. आता आम्हाला खात्री आहे की, मुबंई महापालिका झालेल्या घोटाळा पाहता मुबई महापालिका आमच्या ताब्यात येईल, असा दावाही त्यांनी केला.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....