Petrol diesel price hike : …अन्यथा कर्मचाऱ्यांना गमवावा लागेल रोजगार! काय म्हणणं आहे महापेट्रो डिलर्स असोसिएशनचं?
खासगी पेट्रोल पंपांचा पुरवठा केंद्र सरकारने हस्तक्षेप करून सुरळीत करावा, अन्यथा या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या 1 लाखांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना रोजगार गमवावा लागेल, असा दावा महापेट्रो डिलर्स असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष योगेश बाबर यांनी केला आहे.
पिंपरी चिंचवड : रशिया-युक्रेन युद्धाच्या (Russia Ukraine war) पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे दर (Cruid oil) रोजच वाढत आहे. हेच कारण देत केंद्र सरकार रोजच पेट्रोल-डिझेल दरात वाढ (Petrol diesel price) करू लागले आहे. परिणामी नयारा (एस्सार) कंपनी देशभरातील त्यांच्या डिलर्सला पुरवठा कमी करीत आहेत. त्यामुळे मागील आठ दिवसांपासून राज्यातील या कंपनीचे 700 पेट्रोल पंप बंद आहेत. या खासगी पेट्रोल पंपांचा पुरवठा केंद्र सरकारने हस्तक्षेप करून सुरळीत करावा, अन्यथा या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या 1 लाखांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना रोजगार गमवावा लागेल, असा दावा महापेट्रो डिलर्स असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष योगेश बाबर यांनी केला आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. त्यामुळे अनेक पेट्रोल पंप बंद करण्याची नामुष्की ओढावली आहे.
नागरिकही हैराण
पुण्यात या दरवाढीचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर मागे 85 पैशांनी महागल्याने पेट्रोल प्रति लिटर 119.96 रुपयांवर पोहोचले आहे. तर डिझेलने देखील शंभरी पार केली असून, डिझेल प्रति लिटर 102.67 रुपयांवर पोहोचले आहे. पुण्यात पावर पेट्रोल 124.46 रुपये लिटर मिळत आहे. एकीकडे देशभरात पेट्रल डिझेलचे दर दररोज वाढत आहेत. गेल्या 22 मार्चपासून इंधनाच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच आता पुणेकरांना आणखी एक मोठा झटका बसला आहे. तो म्हणजे शहरात सीएनजीच्या (CNG) दरात देखील वाढ करण्यात आली आहे.
#Pune : खासगी पेट्रोल पंपांचा पुरवठा केंद्र सरकारनं हस्तक्षेप करून सुरळीत करावा, अन्यथा कर्मचाऱ्यांना रोजगार गमवावा लागेल, असं महापेट्रो डिलर्स असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष योगेश बाबर यांनी म्हटलंय.#PetrolDieselPriceHike #war अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/pJlmH04UAs pic.twitter.com/tYB0fFtRki
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 6, 2022
खासगी पेट्रोल पंपधारक अडचणीत
महापेट्रो डिलर्स असोसिएशनने यासर्व अडचणींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. इंधनाच्या दरात सातत्याने वाढच होत आहे. याचा परिणाम पेट्रोल पंपांवर होत असून पुरवठा नसल्याने ते बंद आहेत. तेथील कर्मचाऱ्यांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, असे असोसिएशनने म्हटले आहे.