Vasant More | वसंत मोरेंना पुणे शहर प्रमुखपदावरुन हटवलं, राज ठाकरेंचं पत्र जसंच्या तसं

पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अंतर्गत धूसफूस वाढल्यानंतर पुण्यातील मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी मुंबईत दाखल झाले. राज ठाकरे यांनी वेगळ्या कारणासाठी निरोप पाठवल्याचं सुरुवातीला सांगितलं जात होतं. मात्र पुण्यातील नाराजीसंदर्भात राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्याचं दिसत आहे.

Vasant More | वसंत मोरेंना पुणे शहर प्रमुखपदावरुन हटवलं, राज ठाकरेंचं पत्र जसंच्या तसं
वसंत मोरेंची पुणे शहर प्रमुख पदावरुन हकालपट्टीImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 3:05 PM

पुणे : मनसेचे डॅशिंग नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांना मनसे पुणे शहर प्रमुख पदावरुन हटवण्यात आले आहे. मनसे नगरसेवक साईनाथ बाबर (Sainath Babar) यांच्याकडे आता पुणे शहर प्रमुखपदाची धुरा देण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची सही असलेले नियुक्ती पत्र पक्षातर्फे जारी करण्यात आले आहे. मशिदीवरील भोंग्यांसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावण्याबाबत राज ठाकरेंच्या निर्णयानंतर वसंत मोरेंनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी झालेल्या पुण्यातील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. “आपली ही नेमणूक एक वर्षाच्या कालावधीसाठी असून आपल्या पदाचा कार्य अहवाल पाहूनच पुढील मुदतवाढी संदर्भात निर्णय घेतला जाईल” असं या पत्रात साईनाथ बाबर यांना उद्देशून म्हटलं आहे, तर वसंत मोरेंचा कुठलाही उल्लेख या पत्रात नाही.

राज ठाकरेंच्या नियुक्तीपत्रात नेमकं काय?

साईनाथ संभाजी बाबर नगरसेवक, पुणे महापालिका

सस्नेह जय महाराष्ट्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहर अध्यक्ष पदी आपली नेमणूक करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ध्येय धोरणे आणि कार्यक्रम इत्यादी आपण वेळोवेळी आपल्या संघटनेत निष्ठेने राबवावी आणि यामध्ये आपणाकडून कोणतीही कुचराई अथवा तडजोड स्वीकारली जणार नाही, याची आपण नोंद घ्यावी. आपण आणि आपल्या सहकाऱ्यांकडून समाजाला कोणत्याही प्रकारचा उपद्रव होणार नाही, अशा प्रकारचे आपले वर्तन असेल हीच अपेक्षा

आपली ही नेमणूक एक वर्षाच्या कालावधीसाठी असून आपल्या पदाचा कार्य अहवाल पाहूनच पुढील मुदतवाढी संदर्भात निर्णय घेतला जाईल

मराठी बांधवांना, भगिनींना आणि मातांना अभिमान वाटेल अशा प्रकारचे कार्य आपल्या हातून घडो, अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आपणांस आपल्या पदाच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो

आपला नम्र

राज ठाकरे

सकाळी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सोडला

वसंत मोरेंनी आजच (गुरुवारी) सकाळी पुण्यातील उपविभाग प्रमुख आणि उपशहर प्रमुखांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सोडला होता. पक्ष संघटनासाठी बनवलेल्या ग्रुपवर कार्यकर्त्यांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. यावर चर्चा टाळण्यासाठी वसंत मोरेंनी ग्रुप सोडण्याचा पर्याय निवडला होता. एका उपविभाग प्रमुखाच्या पोस्टवरुन ग्रुपमध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर मोरेंनी ग्रुप तर सोडलाच, पण त्याच वेळी सिंहासनावर बसलेला फोटो व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला शेअर केल्याने कुजबूज रंगली होती.

पुण्याचे मनसे पदाधिकारी मुंबईत

पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अंतर्गत धूसफूस वाढल्यानंतर पुण्यातील मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी मुंबईत दाखल झाले. राज ठाकरे यांनी वेगळ्या कारणासाठी निरोप पाठवल्याचं सुरुवातीला सांगितलं जात होतं. मात्र पुण्यातील नाराजीसंदर्भात राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्याचं दिसत आहे. वसंत मोरेंना या बैठकीबाबत कोणताही निरोप देण्यात आलेला नव्हता. त्यानंतर वसंत मोरेंना शहर प्रमुख पदावरुन हटवण्यात आल्याचं वृत्त समोर आलं.

पाहा मनसेच्या आदेशाचं पत्र

वसंत मोरेंची अडचण काय झाली?

वसंत मोरे हे पुणे महापालिकेतील कात्रज प्रभागातून गेल्या 10 वर्षांपासून नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. वसंत मोरे जातीने मराठा असले तरी त्यांच्या प्रभागातील मुस्लीम मतदार त्यांच्या पाठीशी राहिला आहे. मनसेला नव्हे, तर वसंत मोरेंच्या कामामुळे त्यांना पाठिंबा दिला जात असल्याचं म्हटलं जातं. कात्रज प्रभागात मुस्लीम समाजाची जवळपास 3800 मतं आहेत आणि हीच मतं निर्णायक ठरतात. त्यामुळे वसंत मोरे यांची अडचण झाल्याचं बोललं जात होतं.

संबंधित बातम्या :

मनसे पुणे शहरप्रमुख पदावरुन वसंत मोरेंना हटवले, भोंगा प्रकरणानंतर राज ठाकरेंचा मोठा निर्णय

NCP Rupali Patil : बहीण म्हणून वसंत मोरेंच्या पाठीशी; राज ठाकरेंनाही केला सवाल, म्हणाल्या…

Vasant More left group… भोंग्यावरुन बोंबाबोंब! पुण्यातील मनसे नेते वसंत मोरेंनी WhatsApp ग्रुप सोडला

...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.
'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?
'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?.
अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत घेतली भेट, काय घडलं नेमके ?
अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत घेतली भेट, काय घडलं नेमके ?.
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स.
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला.
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल.
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?.
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?.
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल.
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले...
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले....