हजारामागे किती लोकांचं मत इंडिया आघाडीला?; बड्या नेत्याने सांगितलेला आकडा काय?

शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांना देखील बारामतीला बोलवले होते. पण त्याचा पवारांना फारसा उपयोग झाला नाही. आता देखील राहुल गांधी यांना बारामतीला आणले तरी फारसा उपयोग होणार नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.

हजारामागे किती लोकांचं मत इंडिया आघाडीला?; बड्या नेत्याने सांगितलेला आकडा काय?
india allianceImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 07, 2023 | 2:52 PM

भुषण पाटील, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कोल्हापूर | 7 ऑक्टोबर 2023 : येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये थेट लढत होणार आहे. दोन्ही आघाड्या आमनेसामने उभ्या ठाकणार असल्याने यावेळी चुरशीची लढत होणार आहे. लोकसभा निवडणुकीत कुणाचं पारडं जड असेल यावर देशभरात चर्चा सुरू आहे. इंडिया आघाडी भाजपच्या एनडीएला टक्कर देणार का? लोक इंडिया आघाडीला स्वीकारतील का? असे सवाल या निमित्ताने केले जात आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर इंडिया आघाडीला किती मते मिळतील याचा आकडाच सांगितला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

महाराष्ट्रात लोकसभा प्रवास उपक्रम सुरू केला आहे. लोकसभेच्या 45+ जागा जिंकण्यासाठी आमचा उपक्रम आहे. संपर्क ते समर्थन असा आमचा प्रवास आहे. जनता आम्हाला समर्थन देत आहे, याचं समाधान आहे. निवडणूक जवळ येईल तसे आम्हला आणखी समर्थन मिळेल आणि आमचा विजय होईल, असं सांगतानाच 1 हजार लोकांना भेटल्यानंतर दोन ते तीन लोक इंडिया आघाडीला मत देऊ म्हणतात, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

1200 ग्रुप तयार करणार

सोशल मीडियावर जाणीवपूर्वक भाजप विरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण चुकीच्या पद्धतीने तयार केलेलं ग्राफिक्स लोकांना समजतं. त्यामुळं त्याची फारशी चिंता नाही. जनतेला खरं काय आणि खोटं काय आहे कळतं. आम्ही एका लोकसभा मतदारसंघात व्हाट्सएपचे 1200 ग्रुप तयार करून जनतेपर्यंत जाणार आहोत, असं त्यांनी सांगितलं. जनतेला विश्वासात घेऊन सरकार निर्णय घेईल. जनतेला विश्वासात न घेता निर्णय घेता येत नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.

फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत

प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतं की आपला नेता मुख्यमंत्री व्हावा. भाजपच्या नेत्यांना वाटतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावेत. आमच्या केंद्रीय समितीने जर सांगितले की पुढेही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहतील तर आम्हाला काम करावे लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

जो पक्ष सांभाळेल त्याच्यासोबत…

शेकापचे जयंत पाटील यांच्यावर पक्ष शोधण्याची वेळ आली आहे. शरद पवार यांच्याकडे आता पक्ष राहिलेला नाही. अजित पवार यांना आणखी समर्थन मिळेल. जो पक्ष सांभाळेल त्यांच्यासोबत नेते जातील. उद्धव ठाकरे काही दिले नाही, आज एकनाथ शिंदे भरभरून देतात. तर नेते त्यांच्याबरोबर राहतील, असंही त्यांनी सांगितलं.

मुश्रीफांबाबत माहिती नाही

यावेळी त्यांनी हसन मुश्रीफ प्रकरणावर बोलणं टाळलं. हसन मुश्रीफ यांची कारवाई कुठपर्यंत आलीय मला माहिती नाही. पण मला वाटतं त्यांच्यावरची कारवाई मागे घेतलेली नाही, असंही त्यांनी सांगितलं.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.