मोठी बातमी! 40-50 कोटींचा ‘तो’ फटका सरकार दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांकडून वसूल करणार?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकार दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात 30 टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! 40-50 कोटींचा 'तो' फटका सरकार दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांकडून वसूल करणार?
Follow us
| Updated on: Dec 21, 2022 | 5:42 PM

योगेश बोरसे, पुणे : इयत्ता दहावी-बारावीचे वर्ष हे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट असल्याचं मानलं जातं. दहावीनंतर आपल्याला आगामी काळात कोणत्या क्षेत्रात करियर करायचं, याबाबत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी निर्णय घेतलेला असतो. तसेच इयत्ता बारावीनंतरदेखील विद्यार्थी आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्याच्या दिशेला वाटचाल करतात. त्यामुळे दोन्ही इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी ते वर्ष महत्त्वाचं मानलं जातं. विद्यार्थ्यांकडून दहावी-बारावीत चांगले गुण मिळावे यासाठी पालक त्यांना चांगली शाळा आणि ट्युशनमध्ये पाठवतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च वाढतो. विशेष म्हणजे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या याच खर्चात आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण राज्य सरकार एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकार दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात 30 टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता आहे. राज्य शिक्षण मंडळ सध्या आर्थिक तोट्यात आहे. मंडाळाला उत्पन्नाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात खर्च सोसावा लागतोय. त्यामुळे मंडळाला 40 ते 50 कोटींचा आर्थिक फटका बसलाय.

राज्य शिक्षण मंडळाचं हे नुकसान भरुन काढण्यासाठी, तसेच आर्थिक नियंत्रणासाठी दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात तब्बल 30 टक्क्यांनी वाढवण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आलाय.

हे सुद्धा वाचा

आता हा प्रस्ताव राज्य सरकारने मान्य केला तर पुढच्या वर्षापासून विद्यार्थ्यांना शुल्लवाढीस सामोरं जावं लागू शकतं. विद्यार्थ्यांना आजच्या तुलनेत थेट 30 टक्क्यांनी जास्त रक्कम परीक्षा शुल्क मोजावी लागेल.

कोरोना काळात अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. अनेकांची नोकरी गेली. त्यामुळे अनेक पालकं आपल्या मुलांच्या शाळेचं शुल्क भरु शकले नव्हते. त्यामुळे काही ठिकाणी शाळांनी विद्यार्थ्यांना शाळेतून कमी करण्याचे किंवा इतर कारवाई करण्याचा प्रयत्न केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

या दरम्यान काही शाळांनी शुल्कवाढ केल्याचीदेखील बातमी समोर आली होती. त्यानंतर आता दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शुल्कवाढीची बातमी समोर आलीय.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.