Maharashtra Temperature : राज्यात पाऊस अन् तापमान वाढही, वाढत्या तापमानामुळे शासनाचा मोठा निर्णय

Maharashtra City-Wise Temperature / Heat Wave Today News : राज्यासह देशभरात तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. तापमान वाढत असताना अवकाळी पावसाचा फटकाही बसत आहे. पुढील ४८ तासांसाठी पुणे वेधशाळेने राज्यातील काही भागांत गारपीट होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

Maharashtra Temperature : राज्यात पाऊस अन् तापमान वाढही, वाढत्या तापमानामुळे शासनाचा मोठा निर्णय
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 21, 2023 | 3:34 PM

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात उकाड्यामुळे नागरीक हैराण झाले आहेत. कधी कुठे पाऊस पडत आहे तर कधी ऊन प्रचंड तापले आहे. उष्माघाताचा त्रास लोकांना होत आहे. राज्यासह देशभरात तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. आता पुणे वेधशाळेने राज्यातील काही भागांत heat wave तर कुठे पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भात गारपिटीसह पाऊस होणार आहे. दरम्यान वाढत्या तापमानामुळे शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील शाळांना सुटी जाहीर केली आहे. पुणे शहराचे तापमान वाढले आहे. पुण्यात गुरुवारी गारपीटही झाली होती.

काय आहे आयएमडीचा अंदाज

पुढील ४८ तासांत विदर्भातील यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदीया आणि नागपूरसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी गारपीट होणार आहे. तर राज्यातील काही भागात तापमान वाढ होणार आहे. वाढत्या तापमानामुळे प्रशासकीय यंत्रणा देखिल सज्ज झाली आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उपचारांची दिशा, औषधांची उपलब्धता, याबाबत शासनातर्फे जिल्हा शल्यचिकित्सक तसेच जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांना देण्यात आल्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

शाळांना सुटी

राज्यातील सर्व शाळांना २१ एप्रिलपासून सुट्टी जाहीर केली आहे. वाढत्या तापमानामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे. राज्यात वाढती उष्णतेची लाट पाहता शाळांना सुट्टी देण्याचे राज्य शासनाचे आदेश दिले आहे. विदर्भ वगळता इतर ठिकाणी आता सरळ 15 जूनला शाळा सुरू होणार आहे. तर विदर्भात 30 जूनला शाळा सुरू होणार आहे. राज्य शासनाने याबाबत आदेश काढला आहे.

कुठे किती आहे तापमान

Maharashtra temperature on 20th April 2023
शहर तापमान
जळगाव 41.7
सातारा 37.6
मुंबई 37.3
ठाणे 38
सोलापूर 41.1
परभ़णी 40
सांगली 38.6
बीड 39.7
बारामती 38.7
धारा़शीव 39.8
मालेगाव 42
जालना 39.8
नांदेड 38.2
पुणे 38.4

उष्णघातापासून अशी घ्या काळजी

उष्णता टाळायची असेल तर भरपूर पाणी प्या. कारण उन्हाळ्याच्या ऋतूत उन्हात चालल्याने खूप घाम येतो, ज्यामुळे आपल्या शरीरात पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी, ज्यूस, नारळपाणी, लिंबूपाणी यांचे सेवन करावे. त्याचबरोबर जर तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या असेल तर तुम्हाला चक्कर येणे, थकवा येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

जास्त वेळ बाहेर राहू नका

उन्हात बाहेर फिरण्यामुळे उष्माघात होऊ शकतो. त्यामुळे गरज नसेल तर बाहेर पडू नका. उन्हात जाताना कॅप, ओढणी, रुमालाच्या मदतीने शरीर झाकून ठेवा.

आरामदायी कपडे घाला

उन्हाळ्यात बाहेर गेल्यास आरामदायी कपडे घालावेत. कारण गडद रंगाचे कपडे जास्त उष्णता घेतात. त्यामुळे उन्हाळ्यात नेहमी हलके आणि सैल कपडे परिधान करा.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.