‘गावोगावी पावसाळ्यात जशी छत्री उगवते तशी गौतमी पाटील’, तमाशा परिषदेच्या अध्यक्षांची टोकाची टीका

मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव पाटील यांनी डान्सर गौतमी पाटील हिच्यावर सडकून टीका केलीय. पावसाळ्यात जशा छत्री उगवतात तशी गौतमी पाटील असल्याची टीका संभाजीराजे जाधव पाटील यांनी केलीय.

'गावोगावी पावसाळ्यात जशी छत्री उगवते तशी गौतमी पाटील', तमाशा परिषदेच्या अध्यक्षांची टोकाची टीका
Gautami Patil Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 22, 2023 | 7:02 PM

पुणे : लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर (Surekha Punekar) यांनी याआधी अनेकदा डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्यावर निशाणा साधलाय. गौतमी पाटील हिच्या नृत्यावर अनेकदा आक्षेप घेतला जातो. ती अश्लिल हावभाव करुन प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करते, असा आरोप सोशल मीडियावर सर्रासपणे केला जातो. गौतमी पाटील हिच्याकडून याआधी अश्लिल डान्स प्रकरणी माफी देखील मागण्यात आली आहे. असं असताना तिच्या टीका करणाऱ्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच जाताना दिसत आहे. सुरेखा पुणेकर यांनी याआधी गौतमीवर टीका केलेली. त्यानंतर आता मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव पाटील (Sambhajiraje Jadhav Patil) यांनीच गौतमीवर निशाणा साधला आहे. त्यांच्या या टीकेवर गौतमी पाटील हिच्याकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पावसाळ्यात जशा छत्री उगवतात तशी गौतमी पाटील असल्याची टीका मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव पाटील यांनी केली. तमाशा लोककला ही चिरतरून आहे. यात केव्हाही खंडन पडणार नाही. नारायणगाव येथील राहुट्यावर गावकरी हे बुकिंगसाठी येणारच. तर गौतमी पाटील वेगवेगळे हावभाव करते म्हणजे तिच्याकडे काय कला आहे? तिची बरोबरी आमच्या तमाशा कलवंतासोबत होऊच शकत नाही. तर तमाशामधील बाई चापून चोपून साडी नेसते. शेतकरी जगविण्याचं काम आणि त्याची करमणूक करण्याचं काम तमाशा कलावंत करत आहे, असं संभाजीराजे जाधव पाटील म्हणाले.

संभाजीराजे जाधव पाटील नेमकं काय म्हणाले?

“गौतमी पाटील म्हणजे गावोगावी पावसाळ्यात जशी छत्री उगवते त्या पद्धतीची गौतमी पाटील आहे. अशा भरपूर गौतमी पाटील आल्या. पण तमाशा चिरतरुण राहिला. ही लोकनाट्य कला चिरतरुण आहे. जसं विठ्ठलाला भेटायला वारकरी पंढरपूरला जातात. तसंच तमाशा पंढरी असलेल्या नारायणगावला लोक तमाशा पाहण्यासाठी येतात. लोककलेची ही परंपरा अनेक दिग्गजांपासून चालत आलेली आहे. ती चिरतरुण आहे. कधीही खंडन पडणार आहे. गौतमी पाटील ही हंगामी आहे. गावात जशी छत्री उगवते तशी ती आहे”, अशी टीका संभाजीराजे जाधव पाटील यांनी केली.

हे सुद्धा वाचा

“गौतमी पाटीलकडे कोणती कला आहे? आमच्या तमाशातल्या बाई बरोबर ती नाचू शकते का? आमची तमाशातली बाई नऊवारी साडी चापून चोपून नेसते. गौतमी पाटील कोण आहे? अजून एक महिनाभर चालेल. पुन्हा गौतमी पाटील कुठल्या गावात जाईल ते मला माहिती नाही. आमच्या कलाकार प्रेक्षकांना जगण्याची उमेद देतात. ते शेतकरी, सर्वसामान्यांची करमणूक करतात. गौतमी पाटील आणि आमची तुलना होऊच शकत नाही”, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

“तमाशाचं दीड लाखापासून तीन लाखापर्यंतचं बुकिंग सुरु आहे. 10 कोटींची उलाढाल अगोदर झालेली आहे. त्यानंतर आज 15 ते 20 कोटींची उलाढाल होणं अपेक्षित आहे. खर्च भयानक आहे, महागाई आहे. मालकाला पैसे शिल्लक राहत नाहीत”,  अशी उद्विग्नता त्यांनी यावेळी व्यक्त केली.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.