Video | पुणेकराने बनवलेली अशी लग्नपत्रिका पाहिलीच नसणार, पत्रिकेत मेडीकल कीट कशासाठी?
marriage card | लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन. परंतु पुणेकर म्हटले तर या सोहळ्यात काहीतरी वेगळेपण करणारच. एका पुणेकराने केलेले लग्नपत्रिका सध्या चर्चाचा विषय ठरली आहे. ही लग्नपत्रिका म्हणजे मेडीकल कीट आहे. तुम्हाला, आम्हाला होणाऱ्या सामान्य आजारावर उपचार देणारी ही कीट आहे.
पुणे | 9 नोव्हेंबर 2023 : पुणेकर म्हटले तर प्रत्येक गोष्टीत वेगळेपण. पुणे पाट्या हा तर संपूर्ण राज्यात चर्चित ठरलेला विषय असतो. पुणेकरांनी चहाला अमृत बनवून अमृततुल्याची दुकाने सुरु केली. सामाजिक, सांस्कृतीक क्षेत्रात तर पुणेकरांसारखे काम कोणाही करु शकत नाही. यामुळे पुणे शहर हे राज्याची नाही तर देशाची सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते. पुणेकराने बनवलेल्या प्रत्येक गोष्टीची चर्चा होत असते. आता एका पुणेकराने बनवलेली लग्नपत्रिका चर्चेचा विषय ठरली आहे. ही लग्नपत्रिका म्हणजे मेडीकल कीटच आहे. त्यातून तुम्हाला, आम्हाला होणाऱ्या सामान्य आजारावर लागणारे प्रत्येक औषध मिळत आहे. पुणे येथील कोंढवा भागातील सामाजिक कार्यकर्ते इंतखाब फरास यांनी ही लग्नपत्रिका केली आहे. त्यांच्या मुलाचे लग्न १४ नोव्हेंबर रोजी असून त्यासाठी ही पत्रिका केली आहे.
अशी लग्न पाहिली असतील पण…
आपण अनेक प्रकारच्या लग्न पत्रिका पाहिल्या असतील. तसेच मुलगी बघायला गेले अन् लग्न करुन आले, सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न, चाय पे शादी, खजूर पे शादी, आसान निकाह या गोष्टी सर्वच समाजात आता होऊ लागल्या आहेत. परंतु पुणे कोंढवा भागातील सामाजिक कार्यकर्ते इंतखाब फरास यांनी वेगळीच कल्पना लढवली. त्यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नपत्रिकेत मेडीकल कीटच दिली.
marriage card or medical kits#Punekar pic.twitter.com/R6clUuA2sh
— jitendra (@jitendrazavar) November 9, 2023
सामाजिक कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध
इंतखाब फरास स्वतः मॅरेज ब्युरो चालवतात. त्यांनी शेकडो, मुले, मुलींची लग्न या मॅरेज ब्युरोच्या माध्यमातून लावून दिली आहेत. मॅरेज ब्युरो व्यवसाय म्हणून नव्हे तर समाजसेवा म्हणून ते करतात. त्यासाठी कोणतेही शुल्क ते घेत नाही. आता त्यांचा मुलगा झईद याचे लग्न 14 नोव्हेंबर रोजी सोलापूर या ठिकाणी आहे. इंतखाब आणि झईद पुण्यातच राहतात.
काय आहे लग्नपत्रिकेत
ही लग्नपत्रिकेत First aid बॉक्स आहे. त्यात इलेक्ट्रॉल पावडर, कॉटन, कॉटन बँडेज, बँडेड, ऍसिडिटीचा औषध, पेन किलर, डेटॉल, जखमेचा क्रीम, जीरा, कलौंजी, सब्जा बीज इत्यादी वस्तू आहेत. या वस्तू नेहमी घरात हव्या असतात. त्यामुळे लग्नपत्रिकेच्या माध्यमातून त्या देण्याचा प्रयत्न इंतखाब फरास यांनी देऊन आरोग्य सुविधा दिली आहे. आपल्या मित्र आणि नातेवाईकांना त्याचा फायदा होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.