House prices Increased in Pune | मेट्रोच्या सुविधा, विकसित होत असलेल्या परिसरांमुळे पुण्यात घराच्या किंमती वाढल्या ; जाणून घ्या भागानुसार घराचे दर

लॉकडाऊन संपल्यानंतर बांधकाम व्यावसाय पुन्हा रुळावर येण्यास सुरवात झाली. नागरिकही घरामध्ये गंतवणूक करण्यास तयार झाले. पुन्हा एकदा घरांच्या खरेदीस सुरुवात झाली. याचा काळात राज्य सरकारने बांधकाम व्यवसायाला चालना मिळवून देण्यासाठी नोंदणी शुल्कात 1 टक्यांनी कपात केली.

House prices Increased in Pune | मेट्रोच्या सुविधा, विकसित होत असलेल्या परिसरांमुळे पुण्यात घराच्या किंमती वाढल्या ; जाणून घ्या  भागानुसार घराचे दर
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 1:33 PM

पुणे – कोरोनाच्या महामारीचा बांधकाम व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. पुणे शहरात कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पहिल्या टप्प्यात बांधाकाम व्यवसायाला त्याचा मोठा फटका बसला. घर खरेदीचे अनेकांचे स्वप्नच राहिले . मात्र त्यानंतर लॉकडाऊन संपल्यानंतर बांधकाम व्यावसाय पुन्हा रुळावर येण्यास सुरवात झाली. नागरिकही घरामध्ये गंतवणूक करण्यास तयार झाले. पुन्हा एकदा घरांच्या खरेदीस सुरुवात झाली. या काळात राज्य सरकारने बांधकाम व्यवसायाला चालना मिळवून देण्यासाठी नोंदणी शुल्कात 1 टक्यांनी कपात केली. साहजिकच बांधकाम परवान्याच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या प्रीमियम एफएसआयच्या शुल्कात 50  टक्के सवलत दिल्यामुळे शहरातील बांधकामाचे प्रस्ताव वाढले गेले. ही योजना डिसेंबर 2021 पर्यंत होती. परिणामी शेवटच्या महिन्यात सुमारे पुणे महानगर पालिकेच्या बांधकाम विभागाला 400 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.

महामेट्रोच्या जाळ्यामुळे घराच्या किंमतीत वाढ

शहरातील वेगाने विकास होता आलेल्या भागातील घरांच्या किंमतीही तितक्याच वेगाने वाढत आहेत. महामेट्रोच प्रकल्प पूर्ण होत असल्याने वाहतुकीचे जाळे वेगाने विस्तारात आहे. सद्यस्थितीला ज्या भागात मेट्रोचे जाळे तयार होते आहे, त्या परिसरतील घराच्या किंमती वेगानं वाढत आहेत. यामध्ये सुरुवातीपासूनच विकसित असलेल्या कोथरूड परिसरात महामेट्रोचे जाळेही वेगानं विकसित होत आहे. यामुळे या भागातील घराच्या किंमतीमध्येही वाढ होत आहे. सद्यस्थितीला कोथरूडमध्ये टू बीएचके प्लॅट्सच्या किंमती साधारण 80 ते 85 लाखांच्या घरात आहेत. याबरोबरच कोथरूडच्या आजूबाजूचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवणे , वारजे , माळवाडी या परिसरात टू बीएचके प्लॅट्ससाठी 80 लाख रुपये मोजावे लागत आहेत.

नव्याने विकसित होणाऱ्या भागातही घराच्या किंमती अधिक

शहाराच्या पूर्वेकडील भाग म्हणून वाघोली, मांजरी, चंदनगर , लोणी काळभोर हा परिसर ओळखला जात आहे. मागील काही वर्षांपासून हा भाग विकसित होत आहे. नागरीकरण झपाट्याने होत असल्याने या भागातही घराच्या किंमती ३० ते ४० लाखांच्या घरात गेल्या आहेत.

 प्रति चौरस फूट आहेत इतक्या किंमती

डेक्कन 14 ते 16 हजार चौरस फूट ,

प्रभात रोड – 14 ते 16 हजार चौरस फूट,

एरंडवणे- 11 ते 13 हजार चौरस फूट,

कोथरूड – 8 ते 15हजार चौरस फूट ,

वारजे- 5 ते 7 हजार चौरस फूट,

पेठ परिसर- 11 ते 12हजार चौरस फूट ,

भोसलेनगर – 12 ते 15 हजार चौरस फूट,

कर्वेनगर 7 ते 13 हजार चौरस फूट ,

औंध- 7 ते 10 हजार चौरस फूट,

बाणेर-7 ते 10 हजार चौरस फूट,

पाषाण 6 ते 8 हजार चौरस फूट ,

बावधन-6 ते 10 हजार चौरस फूट असे आहेत.

महानगर पालिकेकडून उत्पन्न वाढीच्या अपेक्षा ”सन 2021-22  या आर्थिक वर्षात बांधकाम विभागाकडून 1 हजार 185  कोटी रूपयांचे उत्पन्न अपेक्षित ठेवण्यात आले होते. मात्र हे उद्दिष्ट बांधकाम विभागाने डिसेंबर अखेरच पूर्ण केले आहे़.  शासनाची सवलत योजना व लॉकडाऊन काळात बंद असलेली बांधकामे पुन्हा सुरू झाल्याने, यावर्षी तीन महिने अगोदर बांधकाम विभागाने 1 हजार 527 कोटी 73  लाख रूपयांचा महसुल मिळविला आहे. तो उदिद्ष्टापेक्षा अधिक म्हणजे 12. 892  टक्के इतका आहे.  असे पुणे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी लोकमतला वृत्तपत्राला दिली आहे.

Zodiac | 2022 मध्ये या 5 राशींना करावा लागणार आर्थिक संकटांचा सामना, तुमची रास यामध्ये आहे का ?

नववर्षाची सुरवात शेतकरी हीताच्या निर्णयाने : पीएम किसानचा हप्ता जारी, अन् शेतकरी उत्पादक कंपन्यांना 14 हजार कोटी

Indaineचा एक्स्ट्रा तेज गॅस; झटपट स्वयंपाक, हमखास14% वेळ 5 % गॅसची बचत

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.