राज ठाकरे पुण्यात आंदोलन करणार, तळजाई टेकडीवरील प्रकल्पाच्या विरोधासाठी 24 ऑक्टोबर रोजी मैदानात

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात मोर्चेबांधणी करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता थेट पुण्यातच आंदोलन करणार आहेत. (MNS Opposition To The Biodiversity Vasundhara Project at Taljai hill)

राज ठाकरे पुण्यात आंदोलन करणार, तळजाई टेकडीवरील प्रकल्पाच्या विरोधासाठी 24 ऑक्टोबर रोजी मैदानात
राज ठाकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
Follow us
| Updated on: Oct 10, 2021 | 11:20 AM

पुणे: पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात मोर्चेबांधणी करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता थेट पुण्यातच आंदोलन करणार आहेत. तळजाई टेकडीवरील प्रकल्पाला विरोध करण्यासाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वात 24 ऑक्टोबर रोजी पुण्यात मोठं आंदोलन होणार असून त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

मनसेचे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी या आंदोलनाची माहिती दिली. तळजाई टेकडीवर प्रकल्प होत असून या टेकडीवर एक प्रकारचं अतिक्रमणच केलं जाणार आहे. त्याला आमचा विरोध आहे. त्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात येत्या 24 तारखेला हे आंदोलन होणार आहे. सकाळी 7 वाजताच या आंदोलनाला सुरुवात होणार असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं.

भाजपबरोबरच्या युतीवर चर्चा नाही

दरम्यान, काल राज ठाकरे पुण्यात होते. काल त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून विविध मतदारसंघांचा आढावा घेतला. तसेच कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने काही सूचनाही केल्या. राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात पुण्यात भाजपबरोबर युती करण्याची कोणतीही चर्चा झाली नाही. मात्र, आम्ही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या वर्षी पुण्याचा महापौर मनसे ठरवणार आहे, असंही मोरे यांनी सांगितलं.

तळजाई बचाव अभियान

दरम्यान, सहकारनगर भागातील तळजाई टेकडीवरील सुमारे 107 एकर जागेवर नियोजित जैवविविधता वसुंधरा प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प आराखडा (डीपीआर) पुणे महापालिका प्रशासनाने स्थायी समितीकडे मंजुरीसाठी सादर केला आहे. तळजाई जैवविविधता वसुंधरा प्रकल्पास नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील मूळ जैवविविधता नष्ट होण्याची भीती स्थानिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे हा प्रकल्पच रद्द करण्यासाठी नागरिकांनी ‘तळजाई बचाव अभियान’ सुरू केले आहे. त्याची दखल मनसेनेही घेतली असून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज ठाकरेंच्या जोरबैठका

शुक्रवार सायंकाळी 5 वाजता राज ठाकरे यांच्या हस्ते पुणे शहरातील सर्व शाखा अध्यक्ष यांना नेमणूक पत्र वितरण देण्यात आले. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता शहर पदाधिकारी बैठक झाली. यावेळी 9 शहर संघटक, 6 शहर सचिव, 9 विभाग सचिव बैठकीला उपस्थित होते. यानंतर सायंकाळी 6.30 वाजता 3 राज्य उपाध्यक्ष, 4 राज्य सरचिटणीस, 1 कार्यालयीन प्रमुख, 1 प्रसार माध्यम प्रमुख, 1 राज्य सचिव प्रवक्ता यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. शनिवारी 9 सप्टेंबर रोजी पीवायसी जिमखाना भांडारकर रोड बाल शिक्षण मंदिर समोर सकाळी 10 वाजता 10 उपशहर अध्यक्ष, 8 विभाग अध्यक्ष यांच्यासोबत बैठक पार पडली. त्यानंतर सकाळी 11 वाजता 18 आजी माजी नगरसेवकांसोबत बैठक झाली.

संबंधित बातम्या:

राज ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर जाणार, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठका

अजित पवार लपवण्यासारखं काही करत नाहीत, आयकरच्या धाडीवर राष्ट्रवादी प्रदेशांची पहिली प्रतिक्रिया

पवारांच्या पुण्यातील ‘मोदी बागेतच’ छापेमारी सुरू; सकाळपासून आयकर विभागाची झाडाझडती सुरू

(MNS Opposition To The Biodiversity Vasundhara Project at Taljai hill)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.