ना शरद पवार, ना सुप्रिया सुळे… राज ठाकरे यांनी रेखाटले अजितदादा यांचे व्यंगचित्र; कुंचल्यातून काय सूचवायचंय?

व्यंगचित्र पाहताना शिवशिवतो. शांतता मिळत नसल्यानं मी व्यंगचित्र काढत नाही. काही काही व्यंगचित्र भाषणातून बाहेर पडतात. मी चित्रात रमणारा माणूस आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

ना शरद पवार, ना सुप्रिया सुळे... राज ठाकरे यांनी रेखाटले अजितदादा यांचे व्यंगचित्र; कुंचल्यातून काय सूचवायचंय?
Raj ThackerayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 05, 2023 | 12:27 PM

पुणे : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा जाहीर केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. पवार यांच्या या निर्णयाचे प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने विश्लेषण करत आहे. अजित पवार 40 आमदारांना घेऊन भाजपसोबत हातमिळवणी करणार होते. त्यांना चेकमेट देण्यासाठीच शरद पवार यांनी हा डाव टाकल्याचं बोललं जात आहे. आपल्या हयातीतच पक्ष फुटलेला पाहायला नको, म्हणून पवार यांनी हे पाऊल उचललं असल्याचंही सांगितलं जात आहे. या सर्व चर्चा सुरू असतानाच आणि अनेक कयास व्यक्त केले जात असतानाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात चक्क अजित पवार यांचे व्यंगचित्र काढल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

बालगंधर्वमध्ये आंतरराष्ट्रीय व्यंगचित्रकार महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवाचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी राज ठाकरे यांना एक व्यंगचित्र काढण्याची गळ घालण्यात आली. त्यामुळे व्यंगचित्रकार आणि आयोजकांच्या शब्दाला मान देत राज ठाकरे यांनी हातात कुंचला घेतला. राज ठाकरे यांनी बऱ्याच महिन्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमात हातात कुंचला घेतल्याने ते कुणाचे चित्र काढतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. राज ठाकरे हे लता मंगेशकर, बाबासाहेब पुरंदरे, बाळासाहेब ठाकरे किंवा पंतप्रधा नरेंद्र मोदी यांच्यापैकी एकाचं व्यंगचित्र काढतील असं प्रत्येकाला वाटत होतं.

हे सुद्धा वाचा

कुंचला आणि फटकारे

परंतु प्रत्यक्षात मात्र सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. राज ठाकरे यांनी जे व्यंगचित्र काढलं त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. राज यांनी चक्क अजित पवार यांचं व्यंगचित्र चित्तारलं. एकीकडे शरद पवार यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीत गोंधळाची स्थिती निर्माण झालं आहे. अजित पवार हे बंडाळी करणार असल्यामुळेच शरद पवार यांनी राजीनामा दिला असल्याचं सांगितलं जात आहे. अजितदादांभोवती संशयाचं वलय निर्माण झालेलं असतानाच राज ठाकरे यांनी अजित पवार यांचं व्यंगचित्र काढल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

अन् सर्वांच्या भुवया उंचावल्या

राज ठाकरे केवळ अजित पवार यांचं व्यंगचित्र काढून थांबले नाहीत. चित्र काढल्यानंतर त्यांनी सूचक विधानही केलं. व्यंगचित्र काढल्यावर शेवटी नावं न लिहिता म्हणाले गप्प बसा. असं राजकीय व्यंगचित्र काढण्यासाठी पुरेसा वेळ लागतो. आता जे झालं ते गोड माना. मला असं व्यंगचित्र काढायची सवय नाही, असं राज ठाकरे म्हणाले. त्यामुळे तर अधिकच चर्चांना उधाण आलं. राज ठाकरे यांना आपल्या कुंचल्यातून काय सांगायचं आहे? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे. राज ठाकरे यांना आयोजकांनी सध्याच्या राजकीय घडामोडीवर व्यंगचित्र काढायला सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी हे व्यंगचित्र काढलं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.