राज ठाकरे यांच्या गुढी पाडव्याच्या सभेचा नवा टिझर, सभेपूर्वी टिझरची जोरदार चर्चा
राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी संपली. आता निकाल काही दिवसांत येणार आहे. शिवसेनेतील या संघर्षावर राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. गुढीपाडव्याच्या सभेसाठी केलेल्या टिझरमधून राज ठाकरे यांच्या भूमिकेचे संकेत दिले गेले.
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या गुढीपाडव्याला होणाऱ्या सभेचा टिझर जारी झाला आहे. धर्म आणि मराठी या दोन विषयांवर वाहिलेला हा टिझर चांगलाच चर्चेत आला आहे. ॥ ठाकरी तत्त्व, मराठी सत्त्व आणि धर्माभिमानी हिंदुत्व ॥, असे लिहित मनसेतर्फे हा टिझर ट्विट केला गेला आहे. या टिझरमुळे राज ठाकरे गुढीपाडव्याला होणाऱ्या सभेत काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनसेकडून राज ठाकरे यांची हिंदूजननायक ही प्रतिमा अधोरेखित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे गुढीपाडव्याला होणारी सभाही वादळी होणार आहे.
॰॥ ठाकरी तत्त्व, मराठी सत्त्व आणि धर्माभिमानी हिंदुत्व ॥॰#मनसे_पाडवामेळावा #हिंदवीस्वराज्य #महाराष्ट्रधर्म #महाराष्ट्रसैनिक pic.twitter.com/tNNFDn16nf
हे सुद्धा वाचा— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 17, 2023
दरवर्षी गुढी पाडव्याला (Gudipadwa) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ शिवतिर्थावर जोरदार धडाडते. आता २२ मार्च रोजीही राज ठाकरे यांची सभा आहे. यामुळे मनसैनिकांना राज ठाकरे यांच्या (Raj Thackeray Gudipadwa Speech) तडाखेबाज भाषणाची प्रतीक्षा लागली आहे. आता जारी केलेला टिझर (Mns Teaser) वरुन राज ठाकरे यांच्या सभेची उत्सुक्ता ताणली गेली आहे. यामुळे हा टेलर असून पूर्ण पिक्चर गुढी पाडव्याला शिवतिर्थावर दिसणार असल्याचे मनसेतर्फे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचे भाषण राज्यात काही दिवस चर्चेत राहणार असल्याची चिन्ह दिसत आहे.
काय आहे टिझरमध्ये
राज ठाकरेंच्या गुढी पाडव्याच्या सभेचा नवा टिझरमध्ये मराठी, हिंदू आणि महाराष्ट्राच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. २२ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजता राज ठाकरे यांची मुंबईतील शिवतीर्थावर सभा होणार आहे. टिझरमध्ये हिंदू ही दोन अक्षरे जगा, मराठी या ३ अक्षरांवर प्रेम करा, महाराष्ट्र या चार अक्षरांसाठी काम करा, राज ठाकरे या पाच अक्षरे नेहमीच पाठीशी असतील, असे म्हटले आहे.
राज ठाकरे यांच्या टार्गेटवर कोण?
राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी संपली. आता निकाल काही दिवसांत येणार आहे. शिवसेनेतील या संघर्षावर राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. आता मुंबई महापालिकेसह काही मोठ्या महापालिकांच्या निवडणुका काही महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिने राज ठाकरे यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे.यामुळे राज ठाकरे यांचे भाषण वादळी ठरणार आहे. हे भाषण तुम्हाला टिव्ही 9 मराठीच्या चॅनलवर आणि यूट्यूब लाईव्हसह सगळीकडे पाहताच येणार आहे. शिवाय भाषणाची प्रत्येक अपडेट तुम्हाला आमच्या वेबसाईटवर मिळणार आहे.