सासू- सुनेला बोलली ‘तू नकटी आहेस’…? सुनेने केला सरळ चाकू हल्ला

Pune Crime News | सासू-सुनेतील 'तू तू मैं मैं' घराघरात असते. सासू-सूनेतील नाट्यावर अनेक मालिका मराठी आणि हिंदीत निघाल्या आहेत. परंतु पुण्यात सासूने सुनेला नकटी म्हटले. त्यानंतर संतापलेल्या सुनेने सरळ सासूवर चाकू हल्ला केला. हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले.

सासू- सुनेला बोलली 'तू नकटी आहेस'...? सुनेने केला सरळ चाकू हल्ला
Follow us
| Updated on: Oct 28, 2023 | 1:24 PM

प्रदीप कापसे, पुणे | 28 ऑक्टोंबर 2023 : सासू- सूनेचे नाते अनेक ठिकाणी आई-मुलीसारखे असते. सासू-सुनेतील ‘तू तू मैं मैं’ त्या ठिकाणी होत नाही. परंतु काही ठिकाणे अपवादही आहेत. सासू-सुनेतील या नाट्यामुळे पुणे शहरात धक्कादायक प्रकार घडला. सासूने सुनेला नकटी म्हटले…त्यानंतर सुनेला प्रचंड राग आला. रागाच्या भरात तिने सासूवर चाकूने हल्ला केला. या घटनेत सासू गंभीर जखमी झाली आहे. ही घटना पुणे शहरातील येरवडा येथील गणेश नगरमध्ये घडली. याप्रकरणी सुने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे अनेकांना धक्का बसला आहे. नात्यांमध्ये कडू-गोड प्रसंग येतात, परंतु हल्ला करण्यासारख्या प्रकार संतापजनक असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

नेमके काय घडले

संध्या अशोक मगर (वय ४५, रा. गणेश नगर, येरवडा) यांची मालनबाई परशुराम मगर (वय ७५) या सासू आहेत. मगर कुटुंब येरवडा येथील गणेश नगरमध्ये राहतात. एकाच घरात राहत असल्यामुळे कधी कधी त्यांच्यात सासू-सुनेमधील भांडणासारखा प्रकार होतो. परंतु नुकताच धक्कादायक प्रकार घडला. या दोघी घरामध्ये असताना संध्या ही मालनबाई यांना ‘तू नकटी आहेस’ असे बोलली. त्यावर मालनबाई यांनी सुद्धा चिडून तिला ‘तू पण नकटीच आहेस’ असे म्हटले.

हे सुद्धा वाचा

संध्या यांनी केला हल्ला

आपणास नकटी म्हटल्याचा संध्या मगर यांना प्रचंड राग आला. तिने सासूबाईंना शिवीगाळ सुरु केली. त्यानंतर हा प्रकार मारहाणपर्यंत गेला. त्यावेळी संध्या हिच्या हातामध्ये कांदा कापण्याची सुरी होती. तिच्याने हल्ला करत तिने मालनबाई यांना गंभीर जखमी केले. मालनाबाई यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी सासू मालनबाई हिने दिलेल्या फिर्यादीवरुन सुनेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासू-सुनेमधील या प्रकारानंतर परिसरातील अनेकांना धक्का बसला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.