HSC Result: बारावीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी, निकालाचा फॉर्म्युला फायनल? पुण्यात बैठकीचं आयोजन
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यासाठीचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात असल्यची माहिती आहे. HSC Result Formula
पुणे: महाराष्ट्र सरकारनं कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यासाठीचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात असल्यची माहिती आहे. शिक्षण मंडळाकडून रविवारी म्हणजेच 20 जूनला महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत बारावी बोर्ड परीक्षांचा निकाल जाहीर करण्याचा फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. (MSBHSE officer meeting will held tomorrow for finalize HSC Result Formula)
रविवारी उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची बैठक
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत बारावी निकालासंदर्भात फॉर्म्युला ठरण्याची शक्यता आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांचं नेमकं मुल्यांकन कसं करायचं यासाठी यापूर्वी राज्य मंडळाच्या बैठका झाल्या. उद्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आलीय. त्या बैठकीत फॉर्म्युल्यावर अंतिम निर्णय होईल.
अकरावीच्या परीक्षेचे गुणांना सर्वाधिक वेटेज
बारावी निकालासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार अकरावी परीक्षेच्या गुणांना सर्वाधिक वेटेज दिलं जाणार असल्याची माहिती आहे. बारावी निकाल जाहीर करण्यासाठी दहावीच्या निकालासाठी जे सूत्र अवलंबण्यात आलं त्यानुसार फॉर्म्युला अंतिम केला जाणार असल्याची माहिती आहे.
विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन परीक्षा रद्द
सन 2020-21 या शौक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षिततेचा विचार करता रद्द करण्यात येत आहे. इयत्ता 12 वी च्या परीक्षेसाठी प्रविष्ठ सर्व विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे उत्तीर्ण करण्यात यावे. इयत्ता बारावीची परीक्षा रद्द केल्यामुळे, अंतर्गत मूल्यमापनाच्या कार्यपद्धतीबाबत तसेच गुणपत्रक /प्रमाणपत्र देण्याबाबत स्वतंत्रपणे निर्देश निर्गमित करण्यात येतील. सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेला असून त्याचा संकेतांक क्रमांक 202106111 720454121 असा आहे.
HSC Exam Cancelled: बारावीची परीक्षा रद्दची बोर्डाकडून अधिकृत घोषणा, परिपत्रक जारीhttps://t.co/o2MPgOCUGZ#HSCExam | #MSBHSE | #SSC | #Corona
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 14, 2021
संबंधित बातम्या:
राज्यात शैक्षणिक वर्षाला सुरुवात, कोरोनामुळे शाळा सुरु करणे शक्य नाही- वर्षा गायकवाड
HSC exams Cancelled : अखेर शिक्कामोर्तब, बारावीची परीक्षा रद्द!
(MSBHSE officer meeting will held tomorrow for finalize HSC Result Formula)