Pune crime : झाडाच्या फांद्या तोडल्या म्हणून महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण, पिंपरीतला प्रकार मोबाइल कॅमेऱ्यात कैद
ज्या झाडाच्या फांद्या तोडण्यात आल्या, त्या झाडाची देखभाल संबंधित मारहाण करणाऱ्या व्यक्तीने केली होती. अशावेळी फांद्या तोडल्याचा त्याला राग अनावर झाला आणि त्याने महावितरणच्या कर्मचाऱ्याला काठीने मारहाण केली.
पिंपरी चिंचवड : पिपरी चिंचवडमधील महावितरण (Mahavitaran) कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. पिंपरीमधील खराळवाडी येथील ही घटना आहे. रामेश्वर वाघमारे असे मारहाण (Beaten) झालेली महावितरण कर्मचाऱ्याचे नाव आहे. मारहाण झाल्याची संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मान्सूनपूर्व कामासाठी वीजवाहक तारांना ज्या झाडाच्या फांद्या अडथळा ठरत आहेत त्या तोडण्याचे काम महावितरणचे कर्मचारी करत होते. त्याचवेळी त्यांना ही मारहाण झाली आहे. ज्या झाडाच्या फांद्या तोडण्यात आल्या, त्या झाडाची देखभाल संबंधित मारहाण करणाऱ्या व्यक्तीने केली होती. अशावेळी फांद्या तोडल्याचा त्याला राग अनावर झाला आणि त्याने महावितरणच्या कर्मचाऱ्याला काठीने मारहाण केली. दरम्यान याप्रकरणी महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri police station) गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
फांद्यांचा तारांना अडथळा
अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या विस्तीर्ण झाल्या आहेत. महावितरणच्या तारांच्या त्या मध्ये येत आहेत. त्यामुळे या तारांना अडथळा निर्माण होत आहे. रहिवाशांच्याही अनेक ठिकाणी तक्रारी येत आहेत. त्यामुळे महावितरण अशा अनावश्यक फांद्या छाटून टाकत असते. पावसाळ्यात अशा फांद्यांचा अधिक धोका होण्याच्या पार्श्वभूमीवर त्या छाटण्यात येत होत्या. या प्रकरणात मात्र संबंधित व्यक्तीने हे झाड वाढवले होते. त्याची देखभाल तो करत होता.
काठीने मारहाण
महावितरणचे कर्मचारी झाडाच्या फांद्या तोडत असताना संबंधित व्यक्तीने एक काठी आणली आणि कर्मचाऱ्याच्या अंगावर धावून जात त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. याचा व्हिडिओही सध्या व्हायरल झाला आहे. कर्मचाऱ्यास मारहाण तर केलीच, पण शिवीगाळही त्याने करत तेथून जाण्यास सांगितले. दरम्यान, उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता.