Pimpri Chinchwad crime : मैत्रीण आमच्याशी न बोलता तुझ्याशीच बोलते म्हणून मोशीत तरुणाला दगडानं ठेचून मारलं!

मैत्रीण आमच्याशी न बोलता तुझ्याशीच बोलते, म्हणून तरुणाचा खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिंपरीतील मोशी (Moshi) याठिकाणी हा प्रकार घडला आहे. आश्चर्य म्हणजे या गुन्ह्यातील दहा आरोपींमध्ये चार अल्पवयीन (Minor) आहेत.

Pimpri Chinchwad crime : मैत्रीण आमच्याशी न बोलता तुझ्याशीच बोलते म्हणून मोशीत तरुणाला दगडानं ठेचून मारलं!
भोसरी पोलीस ठाणेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 9:45 AM

पिंपरी चिंचवड : मैत्रीण आमच्याशी न बोलता तुझ्याशीच बोलते, म्हणून तरुणाचा खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिंपरीतील मोशी (Moshi) याठिकाणी हा प्रकार घडला आहे. आश्चर्य म्हणजे या गुन्ह्यातील दहा आरोपींमध्ये चार अल्पवयीन (Minor) आहेत. कृष्णा रेळेकर असे हत्या झालेल्या 18 वर्षीय तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अविनाश पिसे याला पोलिसांनी अटक केली आहे तर इतर आरोपींना ताब्यात घेतले आहे. मैत्रीण बोलते या क्षुल्लक कारणावरून या तरुणाचा अक्षरश: दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींचा शोध घेतला असून एकाला अटक आणि इतरांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, शुल्लक कारणांवरून खून करण्याचे प्रकार वाढले असून अशाप्रकारचे गुन्हे रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

दगडाने ठेचले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मित्र-मैत्रिणीच्या वादातून एका तरुणाचा दगडाने ठेचून अत्यंत निर्घृण खून करण्यात आला. संबंधीत मुलगी आपल्या एकाच मित्राकडे पाहते, त्याच्याशी बोलते, याचा इतर मित्रांना राग होता. यावरून या तरुणाचे इतरांनी अपहरण केले. त्याला दगडाने ठेचले आणि त्याची हत्या केली. मंगळवारी हा प्रकार घडला आहे.

सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध

मंगळवारी कृष्णाचे अपहरण करण्यात आले होते. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी शोध घेत आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यात आत्तापर्यंत दहा आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी चारजण अल्पवयीन आहेत. पुढील कारवाई सुरू आहे.

आणखी वाचा :

Gunratna Sadavarte: सदावर्तेंच्या अडचणी कमी होईना! मुंबई, अकोला, साताऱ्यानंतर आता कोल्हापुरातही गुन्हा

ST Andolan Ajay Gujar Video : एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे मागतानाचा अजय गुजर यांचा व्हिडीओ व्हायरल, तीनशे रुपयांची मागणी

Thane Firing : ठाण्यात कौटुंबिक वादातून एका व्यक्तीकडून कुटुंबावर गोळीबार, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.