पुण्यात राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेवकाच्या हत्येची सुपारी, राजकीय वर्तुळात खळबळ

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही खळबळ उडाली आहे.

पुण्यात राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेवकाच्या हत्येची सुपारी, राजकीय वर्तुळात खळबळ
Follow us
| Updated on: Dec 29, 2020 | 7:54 PM

पुणे : राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठ नगरसेवकाच्या हत्येची सुपारी देण्यात आल्याचं समोर आलं आहे. कारागृहात असलेल्या सराईत गुंडाला सुपारी दिली असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही खळबळ उडाली आहे. (ncp corporator Baburao Chandere murder offer to criminals in pune)

मिळालेल्या माहितीनुसार, बाबुराव चांदेरे असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाचं नाव आहे. बाबुराव चांदेरे यांच्या हत्येची सुपारी देण्यात आली आहे. या प्रकरणाविरोधात चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून ही सुपारी नेमकी कोणी दिली याचाही पोलीस शोध घेत असल्याचं सांगण्यात येत आहे.

हाती मिळालेल्या माहितीनुसार, बाबुराव चांदेरे हे बालेवाडी पाशान प्रभाग क्रमांक 9 चे नगरसेवक आहे. त्यांचा मुलगा समीर याने या प्रकरणासंबंधी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आपल्यावर कोणीतरी नजर ठेवून असल्याचं बाबुराव यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी तपास काढला असला त्यांच्या हत्येची सुपारी दिली असल्याची माहिती मिळाली. यानंतर तात्काळ त्यांनी यासंबंधी पोलिसांना माहिती दिली.

या प्रकरणात येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला सराईत गुन्हेगार अनिल यशवंते आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंबंधी पोलिसांना सीसीटीव्ही फूटेजही मिळाल्याचं समोर आलं आहे. त्यानुसार पोलीस पुढील तपास करत असून सुपारी नेमकी कोणी दिली याचा शोध सध्या सुरू आहे. (ncp corporator Baburao Chandere murder offer to criminals in pune)

संबंधित बातम्या – 

बेपत्ता पत्नी साडेतीन वर्षांनी प्रियकरासोबत सापडली, शिर्डी पोलिसांचा धक्कादायक खुलासा

पुणेकरांचा प्रवास सुसाट होणार, स्वारगेट-कात्रज बीआरटी मार्ग 1 जानेवारीपासून खुला

तेलंगणा पोलिसांची पुण्यात मोठी कारवाई, चिनी महिलेसह तिघांना अटक

(ncp corporator Baburao Chandere murder offer to criminals in pune)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.