अजितदादा गटाच्या किती आमदार आणि खासदारांविरोधात कारवाईचं पत्रं दिलं?, कुणाला दिलं?; सुप्रिया सुळे यांचा मोठा गौप्यस्फोट

भोरमधील एसटी स्थानकाच्या समस्येवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एसटीला माझ्या सहकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळं 5 कोटी निधी आला आहे, एसटी महामंडळाचा कामाचा दर्जा चांगला नाही असं दिसतंय.

अजितदादा गटाच्या किती आमदार आणि खासदारांविरोधात कारवाईचं पत्रं दिलं?, कुणाला दिलं?; सुप्रिया सुळे यांचा मोठा गौप्यस्फोट
supriya suleImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 25, 2023 | 3:05 PM

पुणे | 25 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीत कोणतीही फूट नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. मात्र, अजित पवार हे राष्ट्रवादीचे नेते असल्याचं काल विधान करणाऱ्या सुप्रिया सुळे यांनीही आज घुमजाव केलं. अजित पवार हे राज्यातील एक ज्येष्ठ नेते असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. तसेच अजित पवार यांच्या गटातील किती खासदार आणि आमदारांविरोधात कारवाई करण्याचं पत्रं लोकसभा आणि विधानसभा अध्यक्षांना दिलं याची माहितीही सुप्रिया सुळे यांनी दिली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच अंतर्गत धूसफूस सुरू असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.

राष्ट्रवादी पक्षात कुठलीही फूट नाही. राष्ट्रवादीचे, देशाचे नेते शरद पवार आहेत. राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत. अजितदादा महाराष्ट्राचे एक जेष्ठ नेते आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच अजितदादा गटाच्या 9 आमदार आणि 2 खासदारांनी पक्षाच्या विचारसरणीच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. त्यांच्या विरोधात एक पत्र महाराष्ट्र आणि दिल्लीच्या स्पीकरला पाठवलेलं आहे, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

त्यांनाच फोटोचा अधिकार

शरद पवार यांच्या फोटोच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. जे राष्ट्रवादी पक्षात आहेत, जे शरद पवार यांना देशाचा नेता मानतात, जयंत पाटील यांना महाराष्ट्राचा अध्यक्ष मानतात त्यांना पवार साहेबांचा फोटो लावायला हरकत नाही. जे पक्षाच्या विरोधात जाऊन काम करतात, म्हणजे जे शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेतात, कामगारांच्या विरोधात, कष्टकऱ्यांच्या विरोधात, मणिपूरच्या विरोधात भूमिका घेतात त्या लोकांच्या भूमिका आम्हाला मान्य नाहीत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

संभ्रम फक्त मीडियात

राष्ट्रवादीतील फुटीनंतर कार्यकर्ते संभ्रमात आहे. त्यावर त्यांना विचारलं असता, संभ्रम फक्त टीव्हीवर असतो. संभ्रम फक्त मीडियावाले लावतात. आमच्या कुणाच्या मनात संभ्रम नाही. आम्ही काही भाष्य केले की, काहीही अभ्यास करत नाहीत आणि आरोप केला जातो. माझा काही पत्रकारांवर आरोप आहे, तुम्ही पूर्ण कंटेंट वाचत नाही. घाई घाई करू नका, अशी विनंती त्यांनी केली.

आमच्यात संभ्रम नाही

राष्ट्रवादी पक्षाची स्थापना शरद पवारांनी 24 वर्षांपूर्वी केली. त्या राष्ट्रवादीवर असंख्य नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार या सगळ्यांचं प्रेम आणि विश्वास आहे. या सर्वांचा आदर ठेऊन गेली 24 वर्ष आम्ही महाराष्ट्र आणि देशाची सेवा करण्याचा प्रयत्न करतोय. संभ्रम आमच्यात नाही, संभ्रम फक्त चॅनलमध्ये दिसतो, ज्याला जो वाटेल त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. जो आम्हाला योग्य वाटतं नाही त्यांच्यावर आम्ही स्पीकरकडे स्पष्टीकरण मागितलेलं आहे. त्या 9 आमदार आणि 2 खासदारांना स्पष्टीकरण द्या अशी मागणी केलेली आहे. त्यांचं उत्तर आल्यावर ते आम्ही तुमच्या बरोबर शेअर करू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.