Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar | पुणे पालकमंत्रीपदानंतर अजित पवार यांची नजर या महत्वाच्या खात्यावर

Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सरकारमध्ये सहभागी होताच उपमुख्यमंत्री झाले. शिंदे गटाच्या विरोधानंतर त्यांना अर्थ खाते मिळाले. पुणे भाजपच्या विरोधानंतर त्यांना पुणे पालकमंत्रीपद मिळाले. आता आणखी एका महत्वाच्या....

Ajit Pawar  | पुणे पालकमंत्रीपदानंतर अजित पवार यांची नजर या महत्वाच्या खात्यावर
Follow us
| Updated on: Oct 26, 2023 | 11:05 AM

योगेश बोरसे, पुणे | 26 ऑक्टोंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसमधून आपले वेगळे अस्तित्व निर्माण करुन अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडली. अजित पवार भाजप-शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवार यांच्यासोबत जवळपास ४० आमदार असल्याचा दावा केला जात आहे. सरकारमध्ये गेल्यानंतर अजित पवार गटाला नऊ मंत्रिपदे मिळाली. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या समावेश झाल्यानंतर अनेक दिवस खाते वाटप झाले नव्हते. अजित पवार अर्थखात्यासाठी अडून बसले होते. शिंदे गटाचा त्यांना अर्थखाते देण्यास विरोध होता. अखेर खातेवाटपात अजित पवार यांना अर्थखातेच मिळाले. त्यानंतर अजित पवार यांची नाराजी दूर झाली.

पालकमंत्रीपदासाठी आग्रह

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भाजपकडे होते. परंतु पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवार यांना हवे होते. अजित पवार यासाठी आडून बसले होते. त्यामुळे अनेक दिवस पालकमंत्रीपदासाठी जिल्ह्यांचे वाटप झाले नव्हते. भाजपचे नेते आणि कार्यकर्ते पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोडण्यास तयार नव्हते. शेवटी याठिकाणी भाजपला तडजोड करावी लागली. दोन दादांमध्ये पुन्हा अजित पवार वरचढ ठरले. त्यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले. चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूर आणि अमरावतीची जबाबदारी दिली गेली.

हे सुद्धा वाचा

आता कोणत्या खात्यासाठी आग्रह

राज्याच्या मंत्रिमंडळाचा पुन्हा विस्तार होणार आहे. या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसला चार ते पाच खाते मिळणार आहे. त्यात गृहनिर्माण खात्यासाठी अजित पवार गट आक्रमक झाला आहे. गृहनिर्माण खात्याची मागणी अजित पवार यांनी केली आहे. सध्या अतुल सावे यांच्याकडे गृहनिर्माण खात्याची जबाबदारी आहे. गृहनिर्माण खाते सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे महत्वाचे खाते आहे. त्यामुळे यासाठी अजित पवार आग्रही आहेत. यापूर्वी दोन वेळेस अजित पवार यांची मागणी मान्य झाली होती. आता गृहनिर्माण खातेही भाजप त्यांच्यासाठी सोडणार आहे का? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. हे खाते मिळाले नाही तर अजित पवार नाराज होतील का? हे त्यानंतर स्पष्ट होणार आहे.

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.