Rohit Pawar | निवडणूक आयोगात शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप, रोहित पवार अजित पवार गटावर बरसले

अजित पवार गटाकडून शरद पवार यांच्यावर निवडणूक आयोगात गंभीर आरोप करण्यात आल्याने रोहित पवार यांनीही नाराजी व्यक्त केलीय. अजित पवार गटाच्या युक्तिवादावर जितेंद्र आव्हाड भावूक झाले. तर रोहित पवार यांनी आपल्याच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना चांगल्याच कानपिचक्या लगावल्या.

Rohit Pawar | निवडणूक आयोगात शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप, रोहित पवार अजित पवार गटावर बरसले
Follow us
| Updated on: Oct 07, 2023 | 4:57 PM

रणजित जाधव, Tv9 मराठी, पुणे | 7 ऑक्टोबर 2023 : केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? या मुद्द्यावरुन नुकतीच सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या वकिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. शरद पवार हे पक्षात मनमानीपणे वागत होते. पक्षात पक्षांतर्गत निवडणुका झाल्या नाहीत, असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आला. या सुनावणीवर शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपले काका अजित पवार आणि त्यांच्या गटावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांनाही टोला लगावला.

“ट्रोल करणं हे त्यांचं काम आहे. आज हे लोक वडिलांनाच घरातून बाहेर काढू लागले आहेत. शरद पवारांनी आजवर अनेकांना मंत्रीपद दिली, अधिकारही दिले. त्यांच्या अधिकारात हस्तक्षेप केला नाही. पण आज ते विरोधी गटात स्वार्थासाठी गेले अन् तिथं जाऊन म्हणतात पवार साहेब आमचं चालू देत नव्हते. शरद पवार हे हुकूमशाही पद्धतीने काम करतात असं म्हणतात, हे अशोभनीय आहे”, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.

नवाब मलिक कुणासोबत?

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक अजित पवार यांना पाठिंबा देणार का? असा प्रश्न रोहित पवारांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर त्यांनी फार भाष्य करणं टाळलं. “आज कोण कुठं आहे, यापेक्षा लढा कसा उभारायला हवं याकडे आमचं लक्ष. आलेल्या बातम्यांवर भाष्य करणं योग्य नाही”, असं रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार यांची खोचक टीका

“अजित दादांच्या सभेत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे फोटो दिसतायेत. त्याच चव्हाण साहेबांना पवारांनी गुरू मानलं. त्यांच्या प्रेरणेने शरद पवार राजकारण करतात. आता शरद पवारांचा फोटो वापरता येईना म्हणून यशवंतराव चव्हाण यांचा फोटो वापरत आहेत. आता चुकीच्या पद्धतीने काम केलं तर कराडच्या समाधीस्थळी जाऊन आत्मक्लेश करण्याची गरज नाही. यशवंतराव चव्हाण यांच्या फोटो समोर बसून केलं तरी चालेल”, अशी खोचक टीका रोहित पवारांनी केली.

रोहित पवार यांच्या भुजबळांना कानपिचक्या

“मंत्री छगन भुजबळ आज काहीही बोलतील. पण त्यांनी हे विसरू नये त्यांनाच शरद पवारांनी अनेक मंत्रीपदं दिलेली आहेत”, अशा कानपिचक्याही रोहित पवारांनी यावेळी दिल्या. “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना पुन्हा कधीतरी मुख्यमंत्री करू असंच म्हणणार. आत्ताच मुख्यमंत्री करू, आत्ताच न्याय मिळवून देऊ, आत्ताच मृत रुग्णांना मदत करू, असं ते म्हणणार नाहीत. नेहमीच पुन्हा करू असं त्यांचं म्हणणं असतं”, असा टोला रोहित पवारांनी लगावला.

रोहित पवार यांचा आरोग्य मंत्र्यांवर निशाणा

“अख्खा महाराष्ट्र भिकारी होईल पण आरोग्य मंत्री तानाजी सावंत कधीच भिकारी होणार नाहीत. अगदी असंच सध्या सुरुय. म्हणून तर स्वतःचा विचार करतायेत, रुग्ण मृतांबाबत मला काहीच विचारू नका असं आरोग्य मंत्री म्हणत आहेत”, अशी टीका रोहित पवारांनी केली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.