पुण्यात माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा उपचारादरम्यान मृत्यू

मेहबूब पानसरे हे जेजुरी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक होते. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय होते. पक्षात स्थानिक पातळीवर त्यांचा चांगला दबदबा होता.

पुण्यात माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा उपचारादरम्यान मृत्यू
Follow us
| Updated on: Jul 07, 2023 | 11:52 PM

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जेजुरी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे यांच्यावर शुक्रवारी (7 जुलै) संध्याकाळी काही आरोपींनी धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात मेहबूब पानसरे हे धारातीर्थ पडले. ते रक्तबंबाळ झाले. आरोपी हल्ला करुन पळून गेले. या हल्ल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जेजुरीत त्यांच्यावर उपचार होऊ शकला नाही यासाठी त्यांना पुण्याला हलवण्यात आलं. पण पुण्यात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे जेजुरीसह परिसरात खळबळ उडाली आहे.

मेहबूब पानसरे हे जेजुरी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक होते. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय होते. पक्षात स्थानिक पातळीवर त्यांचा चांगला दबदबा होता. पण त्यांच्यावर निर्घृण हल्ला करण्यात आला आहे. संबंधित घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावण आहे. एका माजी नगरसेवकासोबत इतकं भयानक कृत्य घडू शकतं, मग सर्वसामान्यांचं काय? असा प्रश्न उपस्थित होतोय.

जमिनीच्या वादातून हल्ला?

जमिनीच्या वादातून हा हल्ला आणि खूनाचा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मेहबूब पानसरे यांच्यावर हल्ला करुन आरोपी फरार झाले आहेत. आरोपींनी कोयता आणि कुऱ्हाडीने मेहबूब यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात मेहबूब गंभीर जखमी झाले. त्यांचं खूप रक्त वाया गेलं. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर त्यांना पुण्यात उपचारासाठी नेण्यात आलं. डॉक्टरांनी मेहबूब यांच्यावर उपचाराचे सर्वोतोपरी प्रयत्न केलं. पण त्यात त्यांना यश आलं नाही. मेहबूब यांचा या हल्ल्यामुळे मृत्यू झाला.

मेहबूब पानसरे यांच्या मृत्यूमुळे जेजुरीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झालीय. मेहबूब पानसरे यांच्या कुटुंबावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे आरोपींविरोधात जेजुरीत संताप व्यक्त केला जातोय. आरोपी फरार झाले आहेत. त्यामुळे पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर पकडून जेरबंद करावं, अशी मागणी केली जात आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.