jayant patil : राष्ट्रवादीला धक्का, जयंत पाटील यांच्या अडचणी वाढणार, निकटवर्तींना ईडीची नोटीस

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाचा झेंडा रोवत अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतली. अजित पवार भाजप-शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झाले. त्यांच्यासोबत जयंत पाटील गेले नाही. आता जयंत पाटील यांच्या परिवारातील सदस्याला ईडीची नोटीस आलीय.

jayant patil : राष्ट्रवादीला धक्का, जयंत पाटील यांच्या अडचणी वाढणार, निकटवर्तींना ईडीची नोटीस
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 13, 2023 | 12:26 PM

पुणे | 13 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात शनिवारी गुप्त भेट झाली. या भेटी दरम्यान अजित पवार यांच्याकडून शरद पवार यांना सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे. दोन नेत्यांमधील ही भेट जयंत पाटील यांच्या माध्यमातून झाली. या भेटीबाबत अत्यंत गुप्तता पाळली गेली होती. या भेटीसंदर्भात चर्चा सुरु आहेत. त्याचवेळी राष्ट्रवादीतील शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहे. त्यांच्या निकटवर्तींना ईडीची नोटीस आलीय.

जयंत पाटील अडचणीत

जयंत पाटील यांची यापूर्वीच ईडीकडून चौकशी झाली होती. जयंत पाटील यांची 22 मे 2023 रोजी तब्बल साडे नऊ तास चौकशी करण्यात आली होती. IL अँड FS कंपनीच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणात ही चौकशी झाल्याचे म्हटले जात होते. आता अजित पवार यांच्या गटात न गेलेले जयंत पाटील यांच्या निकटवर्तींना ईडीची नोटीस आली आहे. जयंत पाटील यांचे बंधू जयसिंगराव पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली आहे.

कोण आहेत जयसिंगराव पाटील

जयसिंगराव पाटील यांचे हॉटेलचा व्यवसाय आहे. मुंबईत त्यांचे हॉटेल आहेत. जयसिंगराव पाटील यांच्यासोबत जयंत पाटील यांच्या जवळच्या नातेवाईकांनाही ईडीकडून नोटीस आली आहे. यामुळे जयंत पाटील यांच्यासमोरील अडचणी वाढणार आहे.

काल झाली होती बैठक

अजित पवार आणि शरद पवार यांची गुप्त बैठक 12 ऑगस्ट रोजी झाली होती. ही बैठक घडवून येण्यामागे जयंत पाटील होते. पुणे शहरातील चांदणी चौकातील पुलाचा उद्घाटन कार्यक्रम झाल्यानंतर ही बैठक झाली. चांदणी चौकातील कार्यक्रम झाल्यानंतर अजित पवार ताफा सोडून कोरेगाव पार्क येथील उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीत जयंत पाटील उपस्थित होते.

कोण आहेत अतुल चोरडिया

अतुल चोरडिया हे पवार परिवार परिवाराचे मित्र आहे. यामुळे ही गुप्त बैठक हॉटेलमध्ये ठेवण्याऐवजी त्यांच्या निवासस्थानी ठेवली. परंतु त्यानंतरही या बैठकीची बातमी माध्यमांना मिळाली. त्यानंतर या विषयाची राजकीय चर्चा जोरात सुरु आहे.

खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.