प्रचाराला गेले अन् थेट ठाकरेंच्या उमेदवारालाच ऑफर दिली, जयंत पाटील म्हणाले, वसंत मोरे तुमच्या हाती कधीही तुतारी…

राज्यभरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रोज वेगवेगळ्या घडामोडी बघायला मिळत आहेत. विशेष म्हणजे आज अनोखी घटना बघायला मिळाली आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भर मंचावरुन आपल्याच मित्रपक्षाच्या नेत्याला पक्षप्रवेशाची खुली ऑफिर दिली आहे. त्यामुळे आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

प्रचाराला गेले अन् थेट ठाकरेंच्या उमेदवारालाच ऑफर दिली, जयंत पाटील म्हणाले, वसंत मोरे तुमच्या हाती कधीही तुतारी...
प्रचाराला गेले अन् थेट ठाकरेंच्या उमेदवारालाच ऑफर दिली
Follow us
| Updated on: Nov 10, 2024 | 9:42 PM

हडपसर विधानसभा मतदारसंघांचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारार्थ शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची कात्रजमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी जयंत पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांना पक्षप्रवेशाची खुली ऑफर दिली. “वसंत मोरे तुमच्या हातात आता मशाल आहे. तुमच्या हातात आम्ही कधीही तुतारी देऊ शकतो”, असे स्पष्ट संकेत जयंत पाटील यांनी दिले. त्यामुळे वसंत मोरे आगामी काळात राष्ट्रवादी शरद पवार गटात जाणार का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, यावेळी समालोचकाने गुलाबी शर्ट घातलेला बघायला मिळाला. त्यावर जयंत पाटील यांनी हसतहसत आक्षेप नोंदवला. यानंतर जयंत पाटील यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.

“हडपसर विधानसभा मतदारसंघात प्रशांत जगताप यांना शरद पवार यांनी उमेदवारी दिलीय. ते महाराष्ट्रातील एकमेव शहर अध्यक्ष आहेत जे शरद पवारांसोबत राहिले. प्रशांत जगताप यांनी स्पष्ट सांगितलं, मला तिकडं येणं शक्य नाही. मला परत फोन करू नका. लोकसभेनंतर महाराष्ट्रातील सरकार घाबरलं आणि म्हणेल त्या गोष्टी करायला सुरु केलं. आमचं घड्याळ चोरीला गेलेय, हा आमचा प्रॉब्लेम झालाय. चोरीला गेलेलं घड्याळ आम्हाला दिसत आहे. शरद पवारांनी त्या घड्याळाचे काटे थांबवले आहेत”, असं जयंत पाटील म्हणाले.

‘ह्यांना कोयता गँग कंट्रोल होत नाही आणि…’

“पुणे शहरातील ट्रॅफिकच्या नावावर सत्ता भोगली, पण प्रश्न सुटले नाहीत. पुणे शहराची नवी ओळख ड्रग्सचे शहर होतेय की काय? अशी भीती आहे. कोयता गँग देखील पुण्यात आहे. ह्यांना कोयता गँग कंट्रोल होत नाही आणि मग राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे काय?”, असा सवाल जयंत पाटील यांनी केला.

हे सुद्धा वाचा

‘भाजपकडून शिवरायांचा अपमान’

“भाजपकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला जातोय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील वक्तव्य केलं. शिवाजी महाराजांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. डबल इंजिन सरकारला दिल्लीत कोणीही विचारत नाही. पावसाळी अधिवेशनात सरकाने एक कायदा आणलाय. फडणवीस कायदा. ह्या कायद्यानुसार तुमचं घर-दार जप्त करू शकतात. महाराष्ट्रात कोणी आंदोलन केलं तर त्याला आतमध्ये टाकायचं”, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.

जयंत पाटील भाषणात आणखी काय-काय म्हणाले?

  • “महागाई वाढलीय. तेलाचा डबा 500 ने वाढला. जीएसटी कर मोठ्या प्रमाणात वाढले. तुम्ही सरकारला वर्षाला लाख रुपये टॅक्स देतात. महाराष्ट्रात पाहिजे तशी उधळपट्टी सुरु केली आहे. 17 उद्योग महाराष्ट्रात येणार होते ते बाहेर गेले. काल-परवा मोदींनी टाटा एअरबसचं उद्घाटन केलं. महाराष्ट्राला गुजरातच्या दावणीला बांधण्याचे काम केलं. एकनाथ शिंदे म्हणत होते मोदींनी सांगितलंय मोठा प्रकल्प देऊ. म्हणजे भोपळा देऊ”, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
  • “मी अर्थमंत्री असताना महाराष्ट्र गुजरातच्या पुढे होता. गुजरात आता पुढे गेला. गुजरात पेक्षा महाराष्ट्र गरीब झाला. महाराष्ट्राची अधोगती सुरू आहे. याचा जाब विचारला पाहिजे. दोन वेळा सुरत महाराजांनी लुटली. फडणवीस ते कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. गडबडीत शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला. मुंबईच्या समुद्रात भूमिपूजन केलं. पाण्यावर भूमिपूजन आयुष्यात पहिल्यांदा पहिलं, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. एकनाथ शिंदे म्हणाले वाऱ्यामुळे पुतळा कोसळला. एक नारळ पडला नाही पण पुतळा कोसळतोय”, असं जयंत पाटील म्हणाले.
  • “आमचं सरकार आल्यावर आम्ही महालक्ष्मी योजना सुरु करणार आहोत. महिलांना दर महिन्याला 3000 रुपये देणार, एसटी प्रवास महिलांना मोफत करणार. सुशिक्षित बेरोजगारांना 4000 रुपये देणार. प्रत्येक कुटुंबाचा 25 लाख रुपयांचा विमा देणार. आम्हाला काही लोक म्हणतात यांच्या बापाला जमणार नाही. मी महाराष्ट्राचा अर्थमंत्री राहिलोय”, असं जयंत पाटील म्हणाले.
  • “समोरचे पैसे खर्च करतील. पैशाने काहीही करू शकतो असं समोरच्यांना माहिती आहे. आमचा पक्ष का फुटला? हे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. शरद पावरांना सोडण्याचं काहीही कारण नाही. सगळ्यांच्या मागे भुंगे होते म्हणून गेले”, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.
Non Stop LIVE Update
बॅग चेकिंगचा मुद्दा तापला,ठाकरेंच्या प्रचारावर बंदी घाला;राणेंची मागणी
बॅग चेकिंगचा मुद्दा तापला,ठाकरेंच्या प्रचारावर बंदी घाला;राणेंची मागणी.
'दादांची मी माफी मागते...', जाहीरपणे पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
'दादांची मी माफी मागते...', जाहीरपणे पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?.
... तर माझ्या विजयात उद्धव ठाकरेंचा खारीचा वाटा, राणे असं का म्हणाले?
... तर माझ्या विजयात उद्धव ठाकरेंचा खारीचा वाटा, राणे असं का म्हणाले?.
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, सत्तारांच्या वक्तव्यानं चर्चा
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, सत्तारांच्या वक्तव्यानं चर्चा.
'उद्धव ठाकरेंच्या बॅगेतून दोनचं गोष्टी निघतील...'; राज ठाकरेंचा टोला
'उद्धव ठाकरेंच्या बॅगेतून दोनचं गोष्टी निघतील...'; राज ठाकरेंचा टोला.
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका.
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला.
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?.
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या....
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य.