अजित पवार भाजपमध्ये जाणार का? शरद पवार काय म्हणतात

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार 40 आमदारांसमवेत भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोजक्या शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली. काय म्हणाले शरद पवार पाहूया

अजित पवार भाजपमध्ये जाणार का? शरद पवार काय म्हणतात
Ajit pawar and Sharad Pawar
Follow us
| Updated on: Apr 18, 2023 | 1:30 PM

पुरंदर, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार 40 आमदारांसमवेत भाजपसोबत जाणार असल्याची बातमी इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राने प्रसिद्ध केली अन् राज्यात मोठ्या राजकीय भूकंप झाला. अजित पवार यांनी आज सकाळपासून त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबत असलेले वॉलपेपर हटवले आहे. अजित पवार यांच्या ट्विटर आणि फेसबुकवर वॉलपेपर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अजित पवार यांचा फोटो होता. तो काढण्यात आला आहे.

आता शरद पवार काय म्हणतात

अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर शरद पवार म्हणाले की, तुमच्या मनात जी काही चर्चा आहे, ती आमच्या कोणाच्याही मनात नाही. या चर्चेला काही अर्थ नाही. आमच्या प्रत्येक सदस्याच्या मनात पक्षाला शक्तिशाली करण्याशिवाय दुसरा कोणताही विचार नाही. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मी बैठक बोलावली आहे, ही बातमी खोटी आहे, असे रोखठोक प्रतिपादन शरद पवार यांनी केले.

अजित पवार बाजार समितीच्या कामांमध्ये

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्याक्ष जयंत पाटील बाजार समितीच्या निवडणुकीच्या कामात आहेत. अजित पवारही त्याच कामात आहेत. जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यांवर या निवडणुकीची जबाबदारी दिली गेली आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. अजित पवार यांच्यासोबत काही आमदार फुटून भाजपात जाणार असल्याच्या चर्चेविषयी शरद पवार यांना पुन्हा विचारले असते ते म्हणाले, मी एकदा विषय स्पष्ट सांगितल्यानंतर तुम्हाला त्यासंबंधी फाटे फोडण्याचा अधिकार नाही.

राजेश टोपे म्हणाले

अजित पवार भाजप सोबत जाणार असल्याची चर्चा राज्यात आहे, त्यावर राजेश टोपे म्हणाले की, आम्ही मार्केट कमिटी निवडणूक असल्याने मतदार संघात आहोत. पक्षाच्या संदर्भात पक्षश्रेष्ठीं, शरद पवार आणि अजित पवार जे एकत्र बसून ठरवतात आणि त्याची आम्ही अंमलबजावणी करतो. आमचा पक्ष एकसंघ आहे आणि एकसंघ राहील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांनी दिली आहे.

यापूर्वी केले होते सरकार स्थापन

अजित पवार यांनी यापूर्वी भाजप सोबत काही तासांचे सरकार स्थापन केले होते. मात्र, शरद पवार यांनी त्यावेळी अजित पवार यांचे बंड क्षमवलं होतं. त्यानंतर आता अजित पवार हे भाजप सोबत 40 आमदारांना घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन करणार अशी चर्चा सुरू असतांना अजित पवार यांच्या सोशल मिडियावरील वॉलपेपर हटविणे यावरून कुणाला इशारा आहे का? असेही बोलले जाऊ लागले आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.