Grampanchayat Election Result | अजित पवार यांच्या काटेवाडीत कोण जिंकले? भाजप की अजित पवार

Baramati ajit pawar Gram Panchayat Election | राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले होते. त्यानंतर सोमवारी मतमोजणी झाली. यावेळी राज्याचे लक्ष अजित पवार यांच्या काटेवाडी गावाकडे लागले होते. या ठिकाणी भाजपने अजित पवार गटाची कोंडी केली होती. यामुळे कोण विजयी होणार...

Grampanchayat Election Result | अजित पवार यांच्या काटेवाडीत कोण जिंकले? भाजप की अजित पवार
Follow us
| Updated on: Nov 07, 2023 | 7:48 AM

अभिजित पोते, बारामती, पुणे | 6 नोव्हेंबर 2023 : राज्यातील ग्रामपंचायतीसाठी आज सकाळपासून मतमोजणीस सुरुवात झाली. अजित पवार यांचे गाव असलेल्या काटेवाडी या गावाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. कारण या ठिकाणी महायुतीमधील अजित पवार यांच्या पक्षाला महायुतीमधील भारतीय जनता पक्षाने आव्हान दिले होते. यामुळे या ठिकाणी निकाल कोणाच्या बाजूने लागतो? याची उत्सुकता सर्व राज्याला होती. अजित पवार यांचे वर्षानुवर्षांपासून असलेले वर्चस्व भाजप मोडून काढणार का? याचे उत्तर सोमवारी मिळाले. या ठिकाणी अजित पवार गटाचा विजय झाला. भाजपला पराभवास समोरे जावे लागले. अजित पवार यांच्या पॅनलकडून असलेल्या 24 वर्षीय गौरी गायकवाड विजयी झाल्या.

बारामती तालुक्यात अजित पवार यांचे वर्चस्व राहिले. तालुक्यातील एकूण 32 ग्राम पंचायतपैकी 30 ठिकाणी अजित पवार गटाने विजय मिळवला. दोन जागा भाजपला मिळाल्या. त्यात सर्वात महत्वाची आणि प्रतिष्ठेतेची लढत असलेल्या अजित पवार यांच्या काटेवाडी गावात राष्ट्रवादी विजय झाला. अन्यथा गड आला पण सिंह गेला, अशी परिस्थिती झाली असते. या ठिकाणी भाजपला आव्हान देताच आले नाही. सरपंच आणि सदस्य सर्वच राष्ट्रवादीचे झाले. काटेवाडीत राष्ट्रवादी काँग्रेसला 14 तर भाजपला केवळ 1 जागा मिळाली. एका ठिकाणी अपक्ष उमेदवाराने बाजी मारली.

हे सुद्धा वाचा

शरद पवार गटाचा दारुण पराभव

या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही. तालुक्यातील ३० जागा अजित पवार गटाने मिळवल्या. यामुळे बारामतीचे दादा अजित पवारच ठरले.

तालुक्यातील या ३० ग्रामपंचायती अजित पवार गटाकडे

1)भोंडवेवाडी 2)म्हसोबा नगर 3)पवई माळ 4)आंबी बुद्रुक 5)पानसरे वाडी 6)गाडीखेल 7)जराडवाडी 8)करंजे 9)कुतवळवाडी 10)दंडवाडी 11)मगरवाडी 12)निंबोडी 13)साबळेवाडी 14)उंडवडी कप 15)काळखैरेवाडी 16)चौधरवाडी 17)वंजारवाडी 18)करंजे पूल 19)धुमाळवाडी 20)कऱ्हावागज 21)सायबाचीवाडी 22)कोराळे खुर्द 23) शिर्सुफळ 24) मेडद 25)मुढाळे 26) सुपा 27)गुणवडी 28) डोर्लेवाडी 29) मनप्पावस्ती 30) काटेवाडी

या दोन ठिकाणी भाजपचा विजय

  • पारवडी – भाजपचा सरपंच
  • चांदगुडेवाडी सरपंच भाजप
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.