NEET Exam : परीक्षेतील धक्कादायक प्रकार, सांगलीत अंतर्वस्त्र उलटे परिधान करायला लावून द्यायला लावली परीक्षा

NEET Exam Controversy: नीट परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रांवर विद्यार्थींना त्यांची अंतर्वस्त्र काढून उलटे परीधान करायला लावली. या प्रकारानंतर वाद सुरु झाला आहे. सोशल मीडियावरसुद्धा याबद्दल टीका केली जात आहे. राज्यात सांगलीत तर देशात काही ठिकाणी असे प्रकार घडले आहे.

NEET Exam : परीक्षेतील धक्कादायक प्रकार, सांगलीत अंतर्वस्त्र उलटे परिधान करायला लावून द्यायला लावली परीक्षा
neet exam (file Photo)
Follow us
| Updated on: May 10, 2023 | 10:49 AM

शंकर देवकुळे, सांगली : सांगलीमध्ये पार पडलेल्या नीट परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. या ठिकाणी परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनींना त्यांच्या अंगावरील कपडे आणि अंतर्वस्त्र उलटे परिधान करायला लावले. त्यानंतर परीक्षा द्यायला लावण्याचा संतापजनक प्रकार समोर आला. याबाबत जागृत पालकांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे तक्रार केली आहे. तसेच सोशल मीडियावरही या प्रकाराबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

नेमके काय घडले

देशभरात 7 मे रोजी नीट परीक्षा पार पडली आहे. या परीक्षेदरम्यान सांगलीमध्ये मात्र अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. सांगली शहरातील कस्तुरबा वालचंद महाविद्यालयात परीक्षा केंद्र होते. या केंद्रावर परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनींना परीक्षेला बसण्यासाठी चक्क त्यांचे कपडे आणि अंतर्वस्त्र उलटे परिधान करायला लावले. या ठिकाणी विद्यार्थिनींची तपासणी करून त्यांना त्यांचे कपडे उलटे परिधान करण्याच्या सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना देखील आपली कपडे त्या ठिकाणी असणाऱ्या खोल्यांमध्ये बदलून ते उलटे घालून परीक्षा द्यावी लागली आहे.

हे सुद्धा वाचा

असा उघड झाला प्रकार

परीक्षा संपल्यानंतर बाहेर आलेल्या विद्यार्थिनींच्या अंगावरील कपडे उलटे पाहून पालकांना याबाबत प्रश्न पडला होता. पालकांना याची विचारणा केली असता सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्यासोबत हा सर्व प्रकार घडल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं. त्यानंतर घडलेल्या प्रकारावर पालकांनी संताप व्यक्त केला आहे. सदरच्या घटनेबाबत नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे काही पालकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत.

सेंटरकडून हात वर

दरम्यान सांगलीतील या धक्कादायक प्रकरणानंतर ज्या ठिकाणी परीक्षा पार पडल्या त्या कॉलेज प्रशासनाकडून आपला या परीक्षेची कसलाही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण दिले आहे. केवळ परीक्षेसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीला जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याच्या पलीकडे आपला या परीक्षेशी कसलाही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.त्यामुळे घडलेल्या प्रकाराला जबाबदार कोण? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

तामिळनाडूमध्ये वाद

07 मे 2023 रोजी देशभरात पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा झाली होती. या परीक्षेत सर्वाधिक २१ लाख विद्यार्थ्या बसले होते. परीक्षा संपल्यानंतर चेन्नईतील परीक्षा केंद्राचे कव्हरेज करण्यासाठी गेलेल्या एका महिला पत्रकाराने एक ट्विट केले आणि त्यावरून मोठा वाद निर्माण झाला.

काय होते टि्वट

पत्रकाराने सांगितले की त्याने एक विद्यार्थिनी परीक्षा केंद्राबाहेर एका कोपऱ्यात बसलेली पाहिली, तिला उदास बसलेले पाहून पत्रकाराने विचारले काय झाले. तेव्हा ती म्हणाली, परीक्षा देताना ब्रा न घालण्यास सांगितले गेल्याने तिला खूप लाज वाटत होती. यासंदर्भात त्या पत्रकारने टि्वट केले होते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.