AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खाद्यपदार्थ पॅकिंगसाठी वर्तमानपत्र वापरता येणार नाही, अन्न आणि औषध प्रशासनाचे नवे आदेश काय? वाचा सविस्तर

वर्तमानपत्र प्रिंट करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शाईत केमिकल असते आणि ते केमिकल धोकायदायक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने याबाबत नवीन आदेश काढले आहेत.

खाद्यपदार्थ पॅकिंगसाठी वर्तमानपत्र वापरता येणार नाही, अन्न आणि औषध प्रशासनाचे नवे आदेश काय? वाचा सविस्तर
| Edited By: | Updated on: Dec 22, 2021 | 7:38 PM
Share

पुणे : आपल्याकडे दुकानात हॉटेलमध्ये, रस्त्यावरील गाड्यावर खाद्यपदार्थ खायला देण्यासाठी किवा बांधून देण्यासाठी वर्तमानपत्राचा सर्रास वापर होताना दिसून येतो. मात्रा अन्नपदार्थ पॅक करण्यासाठी वर्तमानपत्र वापरता येणार नाही, कारण वर्तमानपत्र प्रिंट करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शाईत केमिकल असते आणि ते केमिकल धोकायदायक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने याबाबत नवीन आदेश काढले आहेत. त्यामुळे आता पुणेकरांना असे पदार्थ बांधण्यासाठी वर्तमानपत्र वापरण्याचे सोडून द्यावे लागणार आहे. हे तुमच्याच आरोग्याला फायदेशीर ठरणार आहे.

गरम खाद्यपदार्थामुळे केमिकल विरघळते

डायआयब्युटाइल फटालेट आणि डायइन आयसोब्युटाईल या केमिकलचा वापर वृत्तपत्र छपाईसाठी केला जातो. हे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असतात म्हणूनच पदार्थांमधील अतिरिक्त तेल शोषून घेण्यासाठी टीश्यू पेपर किंवा पेपर टॉवेलचा वापर करण्यास सुचवले जाते. ही शाई पोटात गेल्यास पचनक्रियेत बिघाड होऊ शकतो. या केमिकलमुळे अनेक पोटाचे विकारही जडू शकतात.

अन्न आणि औषध प्रशासनाने नवे आदेश काढले

आता अन्न आणि औषध प्रशासन विभागाने नवे आदेश काढले आहेत, त्यामध्ये त्यांनी खाद्यापर्दार्थ वर्तमानपत्रात बांधून देण्यास मनाई केली आहे. हॉटेलचालकांनी, दुकानदारांनी याचे पालन न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते. आपल्याकडे पोहे, वडे, भजी, .यासारखे अनेक गरद पदार्थ सर्रासपणे वर्तमानपत्रात बांधून दिले जातात, मात्र त्यातले केमिकल आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. याबाबतची धोक्याची सूचना फूड, सेफ्टी अँड स्टँडर्ड अॅथोरिटी ऑफ इंडिया यांनीही याआधीच दिली आहे. त्यामुळे या नियमाचे काटेकोर पालन करण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासनाने दिले आहेत.

शिवसेनेचा मोठा नेता भाजपच्या वाटेवर? फडणवीसांच्या भेटीसाठी अर्धा तास घुटमळ!

Belgaon : बेळगावात कन्नडिगांचा उन्माद सुरूच, महाराष्ट्रातल्या वाहनांचे केले नुकसान

Pune crime | पुण्यातील कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेड’ ची 44 लाखांची फसवणूक

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.