Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune News : पुणे शहरात NIAचे छापे, इसिस मॉड्यूल प्रकरणात कोंढवा पुन्हा चर्चेत

Pune Crime News : पुणे शहरात इसिस मॉड्यूलचा प्रकार उघड झाला होता. यानंतर तपास संस्थांचे लक्ष पुणे शहरावर आहे. आता पुन्हा एनआयएने पुणे शहरात छापे टाकले आहे. या छाप्यांमध्ये बॉम्ब बनवण्यासाठी आणलेले साहित्य मिळाले आहे.

Pune News : पुणे शहरात NIAचे छापे, इसिस मॉड्यूल प्रकरणात कोंढवा पुन्हा चर्चेत
NIA
Follow us
| Updated on: Aug 18, 2023 | 8:19 AM

पुणे | 18 ऑगस्ट 2023 : पुणे शहरात १८ जुलै रोजी पुणे पोलिसांनी दोन दशतवाद्यांना अटक केली होती. या दोन्ही दहशतवाद्यांचा संबंध इसिसशी होता. पुण्यात उघड झालेल्या या इसिस मॉड्यूलमुळे खळबळ माजली होती. प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन एटीएसकडून एनआयएने हा तपास घेतला. त्यानंतर एनआयएकडून आरोपींच्या मुसक्या आवरण्यासाठी जोरदार कारवाई सुरु आहे. आता पुणे शहरात एनआयएने पुणे छापेमारी केली आहे. या छापेमारीत बॉम्ब बनवण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य मिळाले आहे.

दहशतवाद्यांचे कनेक्शन

मुंबई अन् पुणे शहरात ३ जुलै रोजी चार जणांना अटक केली होती. त्यात एक जण मुंबईत, एकाला पुण्यात तर इतर दोघांना ठाणे शहरात अटक केली होती. त्यानंतर पुणे शहरात १८ जुलै रोजी एनआयएच्या मोस्ट वॉटेंड दहशतवाद्यांच्या यादीत असलेले इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी पुणे पोलिसांच्या हातात लागले. या दोघांचे इसिस असलेले संबंधामुळे प्रकरणाची संवेदनशीलता वाढली. या सर्वांना जोडणारा आरोपी शाहनवाज आलम हा नामशेष झालेल्या सिमी अन् इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटना पुन्हा सक्रीय करण्याचा प्रयत्न करत आहे.

पुणे शहरात धाडसत्र

इसिस मॉडयुलप्रकरणी पुणे शहरात एनआयएने धाडी टाकल्या. या धाडी कोंढवा परिसरात टाकल्या. या ठिकाणी कागदपत्रांसह आयईडीचे साहित्य जप्त केले. दहशतवाद्यांनी कोंढव्यातील घरातच आयईडीचा साठा ठेवला होता. त्याचा वापर बॉम्ब बनवण्याचा प्रशिक्षणासाठी ते करत होते. देशात मोठा कट घडवण्याचा डाव एनआयएकडून आखला गेला होता. इसिस स्लीपर सेलचा शामिक सादील नाचन याच्या ठाण्यातील घरावरही एनआयएने धाड टाकली.

हे सुद्धा वाचा

आतापर्यंत तपासात काय मिळाले

अटक केलेले आरोपी उच्च शिक्षित आहे. या आरोपींनी आयटी, सायबर, विस्फोटक आणि इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिवाइसचे प्रशिक्षण घेतले असल्याचे तपासातून उघड झाले आहे. या आरोपींचे हँडलर विदेशात बसले आहे. त्यांना विदेशातून फडिंग मिळत होता. आरोपींचा इसिसचा संबंध उघड झाला आहे. देशात मोठा घातपात घडवण्याचा कट त्यांनी आखला होता.

लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.