Pune News | वय वर्ष फक्त नऊ…काय आहे कौशल्य…खेळण्याच्या वयात कसे कमवले मिलियन डॉलर्स
Pune News | पुणे येथील नऊ वर्षीय मुलाने कमाल केली आहे. खेळण्याच्या वयात त्याने मिलियन डॉलर्स कमावले. त्याच्या या कौशल्याची चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे. पुण्यातील हा चिमुकल्याची ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर झाली आहे.
पुणे | 15 ऑक्टोंबर 2023 : पुणे येथील अद्वैत कोलारकर हा नऊ वर्षांचा मुलगा. कार्टून पाहणे आणि खेळण्याच्या वयात त्याने जागतिक पातळीवर आपली ओळख तयार केली आहे. त्याने मिनियन डॉलर्सची कमाई आतापर्यंत केली आहे. अद्वैतची आई श्रुती कोलारकर ग्राफिक डिजाइनर तर वडील अमित कोलारकर सॉफ्टवेयर इंजीनियर आहे. त्यांनी फक्त मुलाचे गुण ओळखले आणि त्याला आठ महिन्यांचा असताना ब्रश देऊन टाकला. मग नवव्या वर्षी त्याने रंगाच्या जगातून मिलियन डॉलर्सची कमाई केली आहे. नुकतीच त्याची एक पेटींग $16,800 (जवळपास १३ लाख रुपये) विकली गेली आहे.
कोणताही क्लास लावला नाही
अद्वैत कोलारकर याने पेटींगचा कोणताही क्लास लावला नाही. कोणतेही प्रशिक्षण घेतले नाही. त्याला कोणी रंगाचे ज्ञानही दिले नाही. आठव्या महिन्यापासून तो स्वत: रंगासोबत खेळू लागला. त्याने जगभरातील अनेक प्रदर्शनात सहभाग घेतला. तो म्हणतो, माझी शैली जॅक्सन पोलॉकसारखी आहे. मला काळा रंग आवडतो. कारण सर्व रंग एकत्र केल्यावर काळा रंगच तयार होतो. आतापर्यंत रंगाच्या दुनियातून त्याने $300,000 कमाई केली आहे.
पेंटीगसोबत खेळाची आवड
अद्वैत याला पेटींगसोबत खेळाची आवड आहे. लहान असताना त्याला कोणी विचारले काय गिफ्ट हवे तर तो पेन्ट मागत होता. अद्वैत म्हणतो, आता जसजसा मी मोठा होत आहे माझी आवड इतर गोष्टींमध्ये वाढत आहे. मी मित्रांसोबत फुटबॉल खेळतो. तसेच वाचनाची छंद आहे. मी स्वत: एक पुस्तकही लिहित असल्याचे अद्वैत याने सांगितले.
चार वर्षांचा असताना आंतरराष्ट्रीय प्रदर्शन
अद्वैतची आई श्रृती म्हणते, आठ महिन्यांचा असल्यापासून अद्वैत पेटींग करत आहे. पहिली पेटींग तो आठ महिन्यांचा असताना पूर्ण झाली. तो चार वर्षांचा झाला तेव्हा त्यांच्या पेटींगचे कॅनडामध्ये प्रदर्शन भरवण्यात आले. दोन महिन्यांसाठी त्याच्या चित्रांचे प्रदर्शन ठेवले होते. परंतु फक्त चार दिवसांत त्याची सर्व चित्रे विकली गेली. आंतराराष्ट्रीय पातळीवर त्याच्या पेंटींगची अनेक प्रदर्शने झाली आहे. आता जानेवारी ते मार्च दरम्यान पुन्हा अमेरिकेत प्रदर्शनाचे आमंत्रण त्याला मिळाले आहे.