Cyclone Tej | चक्रीवादळ येतंय, राज्यात पाऊस कोसळणार का? IMD ने दिले उत्तर

Cyclone Tej | परतीचा मान्सून १९ ऑक्टोबर रोजी देशातून गेला. यंदा मान्सूनने सरासरी गाठलीच नाही. मान्सून परतल्यानंतर आता अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार याची माहिती आयएमडीने दिली आहे.

Cyclone Tej | चक्रीवादळ येतंय, राज्यात पाऊस कोसळणार का? IMD ने दिले उत्तर
TEJ cyclonesImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Oct 21, 2023 | 8:49 AM

पुणे | 21 ऑक्टोंबर 2023 : मान्सून परतला आहे. यावेळी परतीचा पाऊस राज्यात चांगला झाला नाही. यामुळे पावसाची सरासरी कमी राहिली. चार वर्षानंतर राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. मान्सून परतल्यानंतर चक्रीवादळाचे संकट आले आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार आले आहे. यामुळे लक्षद्वीप बेटाच्या पश्चिमेकडे चक्राकार वारे तयार झाले आहेत. यामुळे २१ ऑक्टोबर रोजी दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात त चक्रीवादळ तयार होणार आहे. या चक्रीवादळाचे नामकरण ‘तेज’ असे करण्यात आले आहे. या चक्रीवादळाचा राज्यावर काय परिणाम होणार? ही माहिती पुणे हवामान विभागाने दिली आहे.

चक्रीवादळाचा राज्यावर काय परिणाम होणार

अरबी समुद्रात निर्माण झालेले चक्रीवादळ २६ ऑक्टोबरनंतर पुढे ओमानच्या दिशने जाणार आहे. हे चक्रीवादळ दक्षिण पाकिस्तानात जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रावर या चक्रीवादळचा कोणताच परिणाम होणार नाही, असे हवामान पुणे हवामान विभागाजे शास्त्रज्ञ आणि हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले. हे चक्रीवादळ दक्षिण बांगलादेशाच्या दिशने निघून जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर ओमानकडे जाईल. यामुळे महाराष्ट्रावर त्याचा काहीच परिणाम होणार नाही.

पुणे शहरात ढगाळ वातावरण

पुणे शहरात दोन दिवस आकाश निरभ्र राहणार आहे. तसेच ढगाळ वातावरण राहणार असल्यामुळे उकाड्यात वाढ होणार आहे. तसेच पुणे परिसरात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली. पुणे शहराचे तापमान ३५ अंश सेल्सियसच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर हिटचा परिणाम शहरात जाणावणार आहे.

हे सुद्धा वाचा

चक्रीवादळाचा भारताही परिणाम?

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी तयार होईल. त्यानंतर २३ ऑक्टोबरला पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात तेज हे चक्रीवादळ तयार होणार आहे. हे चक्रीवादळ तीव्र असणार आहे. २४ ऑक्टोबर रोजी विशाखापट्टणमजवळ हे वादळ धडकणार आहे. त्यानंतर ओडिशा आणि बांगालदेशच्या दिशेने जाईल. आंध्रप्रदेश आणि ओडिशाला तेज या चक्रीवादळाचा फटका बसणार आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.