आयटी शहर पुणे, परंतु राज्यातील ‘या’ शहरात मिळतो सर्वाधिक पगार

highest annual salary package : राज्यातील कोणत्या शहरातील कर्मचाऱ्यांना सर्वाधिक पगार मिळत असेल? हा प्रश्न विचारल्यावर तुमचे उत्तर पुणे किंवा मुंबई असेल. परंतु तुमचे हे उत्तर बरोबर नाही. या शहरांना दुसऱ्याच शहराने मागे टाकेल आहे.

आयटी शहर पुणे, परंतु राज्यातील 'या' शहरात मिळतो सर्वाधिक पगार
salary package
Follow us
| Updated on: Jul 10, 2023 | 2:27 PM

पुणे : राज्यात रोजगार देण्यात पुणे, मुंबई हे शहर आघाडीवर आहेत. या शहरांमध्ये राष्ट्रीय नाही तर अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या आल्या आहेत. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती झाली आहे. उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणांचा ओढाही पुणे, मुंबई शहरांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी आहे. परंतु देशात सर्वाधिक पगार देणाऱ्यांमध्ये पुणे, मुंबई शहर नाही. त्यापेक्षा राज्यातील दुसऱ्या एका शहरात जास्त वार्षिक पॅकेज दिले जात आहे. एका सर्वेमधून ही बाब उघड झाली आहे. यामुळे सर्वांचा आश्चर्य वाटत आहे.

कोणत्या शहरात किती पॅकेज

पुणे, मुंबई, दिल्ली या शहरांना मागे टाकत राज्यातील सोलापूर शहराने नोकरीतील पॅकेजसंदर्भात आघाडी घेतली आहे. सोलापूरमध्ये वार्षिक सर्वाधिक पॅकेज दिले जात आहे. सोलापूरनंतर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत 21 लाख 17 हजार 870 रुपयांचे सरासरी पॅकेज आहे. त्यापेक्षा कितीतरी जास्त पॅकेज सोलापूरमध्ये मिळत आहे. देशातील सर्वाधिक पॅकेज देणाऱ्या शहरांच्या यादीत पुणे सातव्या क्रमांकावर आहे. पुणे शहरात सरासरी पॅकेज 18 लाख 95 हजार 370 रुपये आहे. पुणे शहरात सर्वाधिक माहिती अन् तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या आहेत. परंतु त्यापेक्षा जास्त पॅकेज दुसऱ्या शहरात अन् दुसऱ्या क्षेत्रात मिळत आहे.

कोणत्या क्षेत्रात जास्त पगार

सेक्टरनुसार विचार केल्यास मॅनेजमेंट क्षेत्रात सर्वाधिक पगार दिला जात आहे. या क्षेत्रात 29 लाख 50 हजाराचे सरासरी वार्षिक पॅकेज आहे. त्यानंतर विधी क्षेत्राचा क्रमांक आहे. या क्षेत्रात 27 लाख सरासरी पॅकेज आहे. देशातील पॅकेजची सरासरी 5 लाख 76 हजार 851 रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

महिला की पुरुष कोणाला जास्त पगार

लिंगनुसार पगारात पुरुषच आघाडीवर आहे. पुरुषांचा वार्षिक पगार 19 लाख 53 हजार 55 तर महिलांचा वार्षिक पगार 15 लाख 16 हजार 296 रुपये आहे. पदवीनुसार डॉक्टरेट डिग्री घेणाऱ्यांना सर्वाधिक पगार आहे. त्यानंतर क्रमांक मास्टर डिग्रीचा आहे.

कोणत्या शहरांत किती पगार

  • सोलापूर : Rs 2,810,092
  • मुंबई :Rs 2,117,870
  • बंगळूरु : Rs 2,101,388
  • नवी दिल्ली : Rs 2,043,703
  • भुवनेश्वर : Rs 1,994,259
  • जोधपूर : Rs 1,944,814
  • पुणे : Rs 1,895,370
  • हैदराबाद : Rs 1,862,407
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.