अजितदादा सहभाग घेऊन जे चांगले चित्र उभं केलं, त्यावर पूर्णपणे पाणी फिरलं, प्रविण दरेकर असं का म्हणाले?
जबाबदारीने मोठ्या असणाऱ्या व्यक्तींकडून बेजबाबदार वक्तव्य केली असल्याची तक्रार राज्यपालांचे नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आली. त्यानंतर एकमेकांवर आरोप करण्याचा कलगीतुरा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला होता.
पुणेः उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहून विकासाच्या कामात राजकारण नसतं हे दाखवून दिलं. पुण्याची संस्कृती दाखवून दिली पण पण शेवटचा जो कार्यक्रम होता, त्यामध्ये या सर्व संस्कृती आणि परंपरेवर पाणी फिरले कारण दस्तुरखुद्द देशाचे पंतप्रधान आले आहेत आणि राज्यपालांचा नामाचा उल्लेख न करता बोललेलं कोणाच्याही सुसंस्कृत जनतेला हे आवडणारं नाही असे मत विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांना व्यक्त केले. त्यामुळे अजित दादा रे सहभाग घेऊन जे चांगले चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला होता, त्यावर पूर्णपणे पाणी फिरले गेले असल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पुण्यात मेट्रोचे लोकार्पण झाले त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. त्यावेळी जबाबदारीने मोठ्या असणाऱ्या व्यक्तींकडून बेजबाबदार वक्तव्य केली असल्याची तक्रार राज्यपालांचे नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आली. त्यानंतर एकमेकांवर आरोप करण्याचा कलगीतुरा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला होता.
मला वाटतं महाराष्ट्रामध्ये जातीयवाद कुणी पोसला तो पुढे कुणी रुजवला आणि राजकारणात जातीयवादी समीकरणं कोणी आणली हे महाराष्ट्रातील जनतेला पूर्णपणे ज्ञात आहे. आणि तो एवढा खोलवर रुजवला गेला आहे की तो असा बोलून सोडून जाणार नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाचे व्हिजन आणि सर्वसामान्यांना सोबत घेऊन जाण्याच्या विचारानेच जातीयवाद दूर जाऊ शकतो असे मत प्रवीण दरेकर यांना मांडले.
‘ते’ काम शरद पवार साहेबांसाठी करतात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमानिमित्त राज्यातील राजकारणही ढवळून निघाले. स्पष्ट शब्दात आणि थेट हल्ला केला गेला असला तरी काही राजकीय नेत्यांनी नेत्यांची नावं घेता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला राज्यातील राजकारणावर टीकाटीप्पणी झाली. यावेळी प्रवीण दरेकर यांना सांगितले की, उद्धव ठाकरे निश्चितच चांगला कारभार करतात पण ते शरद पवार साहेबांसाठी करतात. पवार साहेबांसाठी ते काम करतात अशी खोचक टीप्पणी मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांच्यावरही प्रवीण दरेकर यांनी केली. त्याचबरोबर त्यांच्यावर टीका करताना त्यांनी त्यांच्यासाठी उद्धव ठाकरे हे निश्चितच चांगले कामकाज करत असल्याचे सांगत त्यांच्यावरही टीका केली.
राष्ट्रवादी सरकारचा फायदा घेऊन फोफावत
शिवसेना हे राष्ट्रवादी सरकारचा फायदा घेऊन फोफावत आहे आणि शिवसेना रितसर कमी होत आहे. सरकारकडून मिळणारा निधी राष्ट्रवादीला मिळतो आहे, त्यांच्या लोकांना मिळतं शिवसेनेच्या आमदारांन निधी मिळत नाही त्यामुळे शिवसैनिक त्रस्त आहे त्यामुळे शरद पवारांचे म्हणणं बरोबर आहे पवार कुटुंबीयांसाठी उद्धव ठाकरे निश्चितच चांगला काम करत असल्याची खोचक टीकाही त्यांनी केला.
बोलघेवडेपणा करण्यापेक्षा पक्ष वाढवा
पुण्यातील या कार्यक्रमात प्रवीण दरेकरांनी विरोधकांवर टीका करताना अनेक राजकीय नेत्यांवर त्यांना टीका केली. नाना पटोले यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आल्यानंतर गो बॅकचे नारे देण्यात आले, यावरुनही प्रवीण दरेकर यांनी नाना पटोले यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांना तुम्ही बोलघेवडेपणा करण्यापेक्षा पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केला तर बरे होईल अशी टीकाही करण्यात आली.
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी जनतेचे काय मत आहे ते जनतेत जाऊन पहावं फक्त आपल्याच कार्यकर्त्यांमध्ये मश्गुल राहू नये असा सल्लाही त्यांना देण्यात आला.
गर्भित इशारा
नारायण राणे यांच्या अटक आणि जामीनाविषयी बोलताना प्रवीण दरेकर यांना राज्य सरकारची दंडेलशाही सुरु असल्याचे सांगितले. त्यामुळे या सर्व घडामोडींवर केंद्रीय गृहमंत्रालयाचे लक्ष आहे, याच पद्धतीने अतिरेक झाला तर निश्चितच केंद्र सरकार याची दखल घेतल्याशिवाय राहणार नाही असा गर्भित इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.
संबंधित बातम्या