पुणे शहरात पाकिस्तान जिंदाबादचे नारे, बिग बॉस फेम अभिजीत बिचकुले संतापले, म्हणाले…
Pune News : पुणे शहरात १७ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर दोन घटना घडल्या आहेत. एकेठिकाणी पाकिस्तान जिंदाबादचे नारे लागले तर दुसऱ्या ठिकाणी गायकाने राष्ट्रध्वजाचा अवमान केला. या प्रकरणात बिग बॉस फेम अभिजीत बिचकुले संतापले आहेत.
सातारा | 17 ऑगस्ट 2023 : पुणे शहरात काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांना अटक झाली होती. त्यानंतर स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील कोंढवा भागात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या. या प्रकरणानंतर सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलिसांनी आयपीसी 153 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले होते. अकबर नदफ आणि तौकीर असे हे आरोपी आहेत. ते सुरक्षा रक्षक असल्याचे सांगण्यात आले. इंग्रजी माध्यमांच्या शाळेत ते सुरक्षा रक्षक आहेत. या प्रकारानंतर बिग बॉस फेम अभिजीत बिचकुले संतापले आहेत.
काय म्हणाले बिचकुले
पुणे सारख्या सांस्कृतिक शहरात पाकिस्तान जिंदाबादचे नारे हे कदापी खपवून घेणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहखाते काय करतय? झोपेच्या गोळ्या घेऊन ते झोपलेत का? मला लेखी पत्र द्या, मी त्यांना शोधून फासावर लटकवतो, असा इशारा बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी दिला आहे.
पुणे पोलीस अलर्ट
पुणे शहरात दहशतवादी सापडले होते. दहशतवादी सापडलेला परिसर कोंढवा होता. त्यानंतर आता १५ ऑगस्ट रोजी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या. यामुळे पुणे पोलीस अलर्ट झाले आहेत. पोलिसांनी या भागातून रूट मार्च काढला आहे. आरोपींमध्ये दहशत पसरावी अन् नागरिकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा म्हणून कोंढवा परिसरात रूट मार्च काढण्यात आला.
गायकाकडून अवमान
युक्रेनमधील गायक उमा शांती हिने राष्ट्रध्वजाचा अवमान केला. ती पुण्यातील मुंडवा भागात एका रेस्तरांमध्ये कार्यक्रम करीत होता. यावेळी तिरंगा हातात घेऊन ती परफॉर्म करीत होती. अचानक तिने हा राष्ट्रध्वज प्रेक्षकांमध्ये फेकला. यामुळे पोलिसांनी उमा शांती आणि कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
व्हिडिओ व्हायरल
उमा शांती हिचा यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर लोकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. दोन्ही प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे.