Ketaki Chitale: केतकी चितळेच्या अडचणीत वाढ ; लिखाणात संत तुकारामचा उल्लेख भोवला, देहू संस्थाननं पत्रक काढत केली अटकेची मागणी
तुकाराम महाराजांचा वापर करून कोणीही लिखाण करू नये असे आवाहन संस्थाननं केलं आहे. याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात देहू संस्थानचे अध्यक्ष नीतीन मोरे यांनीच तक्रार दिली आहे.
देहू – अभिनेत्री केतकी (Ketaki Chitale)चितळेनं राष्ट्रवादीच सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अत्यंत हीन भाषेत लिखाण केले. या लिखाणामध्ये संत तुकाराम महाराजांचा उल्लेख केल्यानं संत तुकाराम देहू संस्थाननं केतकी चितळे विरोधात पत्रक काढलं आहे. संस्थाननं या पत्राद्वारे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj)वारकरी सांप्रदायचं श्रद्धास्थान आहे . तुकाराम महाराजांचा वापर करून कोणीही लिखाण करू नये केअसे आवाहन संस्थाननं केलं आहे. याबाबत देहूरोड पोलीस(Dehu Police )ठाण्यात देहू संस्थानचे अध्यक्ष नीतीन मोरे यांनीच तक्रार दिली आहे.केतकी चितळेने केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे अडचणीत वाढ झाली आहे. केतकीने पोष्ट केलेल्या लिखाणात ‘तुका म्हणे’ हा शब्द वापरण्यात आला असून ती संत तुकारामांची नाम मुद्रा आहे, अभंगाची स्वाक्षरी मानली जाते. त्यामुळे देहूरोड पोलीस ठाण्यात संस्थान कडून पत्र देत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
काय म्हणाली होती केतकी
केतकी चितळेने केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे अडचणीत वाढ झाली आहे. केतकीने पोष्ट केलेल्या लिखाणात ‘तुका म्हणे’ हा शब्द वापरण्यात आला असून ती संत तुकारामांची नाम मुद्रा आहे, अभंगाची स्वाक्षरी मानली जाते. त्यामुळे देहूरोड पोलीस ठाण्यात संस्थान कडून पत्र देत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
केतकीला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी
या वादग्रस्त पोस्टमुळे अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी राज्यभरातून निषेध करण्यात आला आहे. त्यानंतर केतकी विरोधात राज्यभरात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केतकीला न्यायालयाने 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. केतकीच्या अधिक चौकशीसाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती. काल झालेल्या जाहीर सभेत देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील या विषयावर टिप्पणी केली. तसेच राज ठाकरेंनी एक पत्रक काढून अशी प्रवृत्ती वेळीचं ठेचली पाहिजे असं म्हटलं आहे.