AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | पालकांनो, तुमचा मुलगा, मुलगी काय करते याकडे लक्ष द्या; अजितदादांचं नेमकं आवाहन काय?; वाचा सविस्तर

शक्ती कायद्याबद्दलचा त्या कमिटीचा निर्णय झाला की कॅबिनेटपुढे तो येईल. आम्ही त्याला मान्यता दिल्यानंतर येणाऱ्या अधिवेशनामध्ये कायद्यामध्ये रुपांतर होईल असा आमचा प्रयत्न राहिल.

VIDEO | पालकांनो, तुमचा मुलगा, मुलगी काय करते याकडे लक्ष द्या; अजितदादांचं नेमकं आवाहन काय?; वाचा सविस्तर
पालकांनो, तुमचा मुलगा, मुलगी काय करते याकडे लक्ष द्या; अजितदादांचं नेमकं आवाहन काय?
| Edited By: | Updated on: Sep 24, 2021 | 8:09 PM
Share

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरण आणि डोंबिवलीतील सामूहिक बलात्कार प्रकरणावर भाष्य केले. डोंबिवलीत सामूहिक अत्याचार प्रकरणात मुलीने सांगितल्या सांगितल्या आरोपींना पकडण्यात आलं. हे तिने ताबडतोब सांगतिलं असतं तर ही वेळ अजिबात आली नसती. याबाबतीत आई-वडिलांनी पण आपला मुलगा आणि मुलगी काय करते याकडे लक्ष देणं गरजेचं म्हणत अजित दादांनी पालकांचेही कान धरले आहेत. (Parents, pay attention to what your child do; know what exactly is Ajit Pawar’s appeal)

पूर्वीच्या काळी अशा घटना फार ऐकायला येत नसतात. आम्ही जेव्हा अशा घटनांची माहिती घेत असतो तेव्हा असे कळते की 100 पैकी 70 ते 75 टक्के घटना या जवळच्या लोकांकडून घडत असतात. जवळच्यांकडून नातेवाईकांकडून घडत असतात आणि 20-25 टक्के केसेस आपण आता बघितलं प्रेमातून, प्रेमात पडल्यानंतर काही फोटो काढायचे, व्हिडिओ काढायचे, मग ब्लॅकमेलिंग करायचं अशा प्रकारच्या घटना घडताहेत. अशा व्यक्तींना एवढं कडक शासन केलं पाहिजे की ते बघितल्यावर कुणाच्या मनात तस करण्याची हिंमत झाली नाही पाहिजे’, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

अशा घटना घडत असल्यास ताबडतोब सांगा, अजितदादांचे आवाहन

साकीनाका घटनेमध्ये ते आरोपी आणि पीडिता दोघेही एकमेकांना अनेक वर्षे ओळखत होते. त्या दिवशी दारुच्या नशेत त्याच्याकडून माणुसकीला काळिमा फासणारी, मन हेलावून टाकणारी घटना घडली. या प्रकरणी काही तासाच्या आरोपीला अटक करण्यात आली. डोंबिवलीतील घटनेत या मुलीने कुठल्या तरी एका मुलावर प्रेम केलं आणि त्याचा गैरफायदा त्या पोराने घेत तिला वेगवेगळ्या मुलांकडे पाठवायला सुरुवात केली. वास्तविक पहिल्यांदा असं झाल्यानंतरच तिने आरोपी अशा पद्धतीने ब्लॅकमेल करतो असे सांगायला हवे होते, हे 33 वेळा झाल्यावर तिने आईला सांगितलं आणि मग पोलीस स्टेशनला तक्रार आली. तरीही यंत्रणा इतकी जोरात हलली की सगळेच्या सगळे आरोपी अटक झालेले आहेत. माझं सर्वांना सांगणं आहे, अशी घटना घडल्यावर ताबडतोब पोलिसांना सांगावं. आपले पोलीस फार अलर्ट असतात, जो दोषी असेल त्याला पकडलं जातं. त्याच्या संदर्भात कडक कारवाईची भूमिका घेतली जाते.

शक्ती कायद्याबाबत काय म्हणाले?

शक्ती कायद्याबद्दलचा त्या कमिटीचा निर्णय झाला की कॅबिनेटपुढे तो येईल. आम्ही त्याला मान्यता दिल्यानंतर येणाऱ्या अधिवेशनामध्ये कायद्यामध्ये रुपांतर होईल असा आमचा प्रयत्न राहिल. ‘शक्ती कायदा करत असताना आमच्या महिला सुरक्षित राहिल्याच पाहिजेत. शिवाय दुसऱ्या कुणाला नाहक त्रास होता कामा नये, असा नीट विचारपूर्वक तो निर्णय घेतला पाहिजे. (Parents, pay attention to what your child do; know what exactly is Ajit Pawar’s appeal)

इतर बातम्या

सामान्यांसाठी मोठी बातमी! दोन दिवसांत सोने 500 रुपयांपेक्षा अधिक स्वस्त, पटापट तपासा

भाजपकडून फॉल्स प्रपोगंडा राबवला जातोय, महागाई, बेरोजगारीवरुन जयंत पाटलांचा घणाघात

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.