आजोबाला भेटायला नातू गोविंद बागेत; अजित पवार जाणार का?

दिवाळी पाडव्यानिमित्त राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी गोविंद बागेत समर्थकांची सकाळपासूनच रिघ लागली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शरद पवार यांचे समर्थक गोविंद बागेत आले आहेत. शरद पवार यांना शुभेच्छा देतानाच त्यांचे आशीर्वादही घेत आहेत. तर, पाडव्याच्या निमित्ताने पवार कुटुंबही गोविंद बागेत एकत्र जमलं आहे. मात्र, अजित पवार हे गोविंद बागेत येणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आजोबाला भेटायला नातू गोविंद बागेत; अजित पवार जाणार का?
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 14, 2023 | 5:35 PM

पुणे | 14 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे बारामतीतील गोविंद बाग या त्यांच्या निवासस्थानी आहेत. आज दिवाळी पाडवा असल्याने समर्थकांच्या शुभेच्छा ते स्वीकारत आहेत. असंख्य लोक त्यांना भेटत असून शुभेच्छा देत आहेत. त्यांचे आशीर्वाद घेत आहेत. तर काही लोक त्यांच्याशी गप्पाही मारत आहेत. पाडव्याच्या निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंब गोविंद बागेत जमा झालं आहे. दरवर्षी प्रमाणे सर्व कुटुंब एकत्र दिवाळी साजरी करत आहे. मात्र, अजित पवार अजूनही शरद पवार यांना भेटायला गेले नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज सकाळी 7 वाजल्यापासूनच समर्थकांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. सकाळपासूनच त्यांना भेटणाऱ्यांची गोविंद बागेत प्रचंड गर्दी झाली होती. अनेकजण शरद पवार यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत होते. कुणी प्रकृतीची विचारपूस करत होते, तर कुणी शाल आणि गुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देत होते. शरद पवारही या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारत त्यांची अस्थेने विचारपूस करत होते. राज्यातील कानाकोपऱ्यातून पवार यांना मानणारे त्यांचे समर्थक आले होते. 18 वर्षाच्या तरुणांपासून ते 90 वर्षांच्या आजोबांपर्यंत अनेकांनी गोविंद बागेत हजेरी लावली होती. त्यामुळे गोविंद बागेत नुसती माणसांची जत्रा फुलली होती.

नाव घेणं टाळलं

दिवाळी पाडव्या निमित्ताने पवार यांचं कुटुंब एकत्र आलं होतं. दरवर्षी प्रमाणे पवार कुटुंब एकत्र येत असतं. यंदाही हा शिरस्ता कायम आहे. पण अजित पवार संध्याकाळ झाली तरी आले नव्हते. अजितदादांना डेंग्यू झाल्याने ते आले नव्हते. रोहित पवारही गोविंद बागेत नव्हते. दुपारी शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधला. तेव्हा त्यांना या विषयी विचारण्यात आलं होतं. तेव्हा त्यांनी रोहित पवार हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची संघर्ष यात्रा सुरू आहेत. त्यामुळे ते आले नाहीत असं सांगितलं. तसेच काहींचा आजार असल्यामुळे ते आले नाहीत, असंही पवार म्हणाले. शरद पवार यांचा रोख अजितदादांच्या दिशेने होता. पण त्यांनी अजितदादांच्या नावाचा उल्लेख करणं टाळलं. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

अन् पार्थ आले

अजितदादा गोविंद बागेत येणार की नाही ही चर्चा सुरू होती. ही चर्चा सुरू असतानाच संध्याकाळी अजितदादा यांचे चिरंजीव आणि शरद पवार यांचे नातू पार्थ पवार गोविंद बागेत आले होते. पार्थ यांनी गोविंद बागेत येऊन आजोबा आणि आजीचे आशीर्वाद घेतले. त्यांच्याशी गप्पा मारल्या. काही वेळ गोविंद बागेत थांबून नंतर ते निघून गेले.

महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.