पिंपरी चिंचवड पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा लांबणीवर, परीक्षार्थींना सोयीचं परीक्षा केंद्र देण्याचा प्रयत्न
राज्यातील विविध पोलीस आयुक्तालय आणि जिल्हा पोलीस दलांमधील 2019 ची प्रलंबित पोलीस शिपाई भरती प्रक्रिया पूर्ण करणं सध्या सुरु आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात पोलीस शिपाई भरतीसाठी लेखी परीक्षेचं आयोजन करण्यात येत आहे.
पुणे: राज्यातील विविध पोलीस आयुक्तालय आणि जिल्हा पोलीस दलांमधील 2019 ची प्रलंबित पोलीस शिपाई भरती प्रक्रिया पूर्ण करणं सध्या सुरु आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात पोलीस शिपाई भरतीसाठी लेखी परीक्षेचं आयोजन करण्यात येत आहे. प्रलंबित भरती असूनही काही ठिकाणी लेखी परीक्षा लांबणीवर टाकण्याची वेळ आली होती. पुणे पोलीस आयुक्तालयाकडील लेखी परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती. आता पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई गट क परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे.
19 नोव्हेंबरला परीक्षा
पिंपरी-चिंचवड पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा चौथ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. पोलीस आयुक्त कार्यालयानं लेखी परीक्षेची नवीन तारीख 19 नोव्हेंबर निश्चित केली आहे. पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा थेट दिवाळी नंतर तुळशी विवाहाच्या मुहूर्तावर म्हणजेच 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे. परीक्षार्थींची संख्या अधिक असल्याने नियोजन करणे सहज शक्य होत नसल्याने परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
परीक्षांर्थींच्या सोयीनुसार परीक्षा केंद्र देण्याचा प्रयत्न
पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा थेट दिवाळी नंतर तुळशी विवाहाच्या मुहूर्तावर म्हणजेच 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे. परीक्षार्थींची संख्या अधिक असल्याने परीक्षेची तारीख पुढे आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयाचा परीक्षार्थींना त्यांच्या महसल विभागात परीक्षा केंद्र देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, याचं नियोजन करण्यासाठी परीक्षा पुढील महिन्यात घेण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. पहिल्या टप्प्यातील 720 पदांसाठी एक लाख 89 हजार 732 जणांचे अर्ज आलेत.
अधिकृत सूचना पाहण्यासाठी क्लिक करा
राज्य सेवा पूर्व परीक्षा अर्ज करण्यास मुदतवाढ
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात प्रसिद्ध केली होती. राज्य सेवा परीक्षा 2021 अंतर्गत 390 पदांसाठी प्रक्रिया सुरु आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं अर्ज दाखल करण्यासाठी 25 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती.एमपीएससीकडून अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. उमेदवार आता राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करु शकतात. 390 पदांसाठी 2 जानेवारी 2022 ला एमपीएससीकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल. अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ मिळाल्यानं विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. एमपीएससीनं नवीन परिपत्रक काढत अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ दिल्याचं जाहीर केलं आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 31 ऑक्टोबर 2021 रोजी 23:59 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. एकूण 20 संवर्गातील 390 पदांची जाहिरात आली आहे. विद्यार्थ्यांना विहित मुदतीत अर्ज दाखल करण्याचं आवाहन करण्यात आलंय.
इतर बातम्या:
मुंबई महापालिकेचा पैसा शिवसेना पक्षनिधी म्हणून वापरतेय, बाळा नांदगावकर यांचं सनसनाटी पत्र
Pimpari Chinchwad Police constable recruitment 2019 written exam postpone to 19 November