Pimpri Chinchwad: 31 मे रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक आरक्षण सोडत! कशी असेल सोडत प्रक्रिया? जाणून घ्या

Pimpri Chinchwad Municipality Election : सोडत प्रक्रिया पार पाडताना सर्व प्रभाग किंवा वॉर्ड कळून येतील असा एकत्रित नकाशा तसंच प्रत्येक प्रभागाची हद्द दाखवणारा स्वतंत्र नकाशा ठळकपणे दिसावा, अशा पद्धतीनं लावावा लागणार आहे.

Pimpri Chinchwad: 31 मे रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक आरक्षण सोडत! कशी असेल सोडत प्रक्रिया? जाणून घ्या
पिंपरी चिंचवड महानगरपालिकाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 9:27 PM

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या (Pimpari Chinchwad corporation election) अनुशंगाने महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या मंगळवारी (31 मे) निवडणुकीची आरक्षण (Ward Reservation in local body elections) सोडत काढली आहे. सकाळी अकरा वाजता या प्रक्रियेला सुरुवात होईल. आगामी पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad News) महापालिका निवडणुकीसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला आणि सर्वसाधारण म्हणजेच ओपन कॅटेगिरीमध्ये मोडणाऱ्या आरक्षित जागांची सोडत काढली जाईल. प्राध्यापक रामकृष्ण गोरे प्रेक्षागृहात ही सोडत पार पडणार आहे. या सोडतीकडे इच्छुकांचं लक्ष लगालंय. महापालिकेच्या आरक्षणासाठी सोडत काढण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगानं दिल्या होत्या. त्यानुसार 31 मे रोजी ही निवडणूक सोडत काढली जाणार आहे.

कशी असेल सोडत?

राज्य निवडणूक आयोगानं दिलेल्या सूचनेप्रमाणे सोडत प्रक्रियेची रंगीत तालीमही केली जाणार आहे. तसंत संपूर्ण सोडतीचं इतिवृत्तही लिहिलं जाईल. सोडतीचा कार्यक्रम हा महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये पार पडेल. सोडतीसाठी पारदर्शन ड्रम वापरण्यात येणार आहेत. ड्रममध्ये टाकण्यात येणाऱ्या चिठ्ठ्यांचा आकार कमीतकमी ए-फोर साईजचा असेल. चिठ्ठी रोल करुन त्यावर रबर बॅन्ड लावण्यात येतील. हे रबर बॅन्ड एकाच रंगाचे असावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. चिठ्ठीच्या मध्यभागी रबर बॅन्ड लावले जातील.

पाहा Video : महत्त्वाची बातमी

हे सुद्धा वाचा

विद्यार्थ्यांच्या हस्ते लॉटरी

सोडत प्रक्रिया पार पाडताना सर्व प्रभाग किंवा वॉर्ड कळून येतील असा एकत्रित नकाशा तसंच प्रत्येक प्रभागाची हद्द दाखवणारा स्वतंत्र नकाशा ठळकपणे दिसावा, अशा पद्धतीनं लावावा लागणार आहे. ही सोडत शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात येईल. त्याचप्रमाणे कोणत्या पदाच्या आरक्षणाची सोडत कोणत्या प्रभागातून काढण्यात येणार आहे, याचाही माहिती द्यावी लागणारंय. त्यासंबंधिचं पत्रक तयार करुन ते उपस्थितांना वाटलं जाईल.

सोडतीमध्ये आलेला जागा क्रमांच प्रोजक्टद्वारे दाखवण्यात येणारे. संपूर्ण सोडत प्रक्रियेचं चित्रीकरणही केलं जाईल. सोडतीचं प्रक्षेपण स्थानिक माध्यमांवरही दाखवलं जाईल. तसंच नागरिकांना सविस्तर माहिती देणारं एक प्रसिद्धीपत्रकही तयार करुन ते पालिका मुख्यालयातील प्रभाग कार्यालयांमधील सूचना फलकांवर आणि शहराच्या मुख्य ठिकाणी लावण्यात येणार आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.