पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे तिहेरी यश, कशी केली चमकदार कामगिरी?
पिंपरी चिंचवड महानगरपालिका देशातील नाही तर आशियातील श्रीमंत महानगरपालिका आहे. कर वसुलीत मनपाने आता विक्रम केला आहे. मनपाच्या कर संकलन विभागाने यंदा विक्रमी कर वसुली केली आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांना नागरिकांना दिलेल्या साथीमुळे हे शक्य झाले आहे.
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिका देशातील सर्वात श्रीमंत मनपा म्हणून ओळखली जाते. पिंपरी-चिंचवड नगरपालिकेची स्थापना १९८२ मध्ये झाली. त्यानंतरच चारच वर्षांत म्हणजे १९८६ मध्ये नगरपालिकेचे रुपांतर महानगरपालिकेत झाले. आता या मनपाने नवीन विक्रम आपल्या नावावर केला आहे. मनपाच्या चार दशकांचा इतिहासात प्रथमच असा विक्रम झाला आहे. अर्थात त्याला पिंपर-चिंचवडमधील नागरिकांची मिळालेली साथ आणि अधिकाऱ्यांनी केलेले काम महत्वाचे आहे. यामुळेच हा टप्पा गाठला गेला आहे.
काय आहे विक्रम
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाने यंदा विक्रम केला आहे. मनपाने कर संकलनातून 810 कोटी रुपये उत्पन्न मिळवले आहे.महापालिकेच्या इतिहासातील आत्तापर्यंतचे हे सर्वाधिक उत्पन्न आहे. त्यापाठोपाठ बांधकाम विभागानेही वसुलीचा विक्रम केला आहे. त्यानंतर आता महापालिकेचा पाणीपुरवठा विभागाही मालामाल झाला आहे. या आर्थिक वर्षामध्ये पाणीपुरवठा विभागाला तब्बल १४९ कोटी २९ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. मागील दोन वर्षांपूर्वीच्या उत्पन्नाचा विचार करता पाणी पुरवठा विभागाने तब्बल ५० कोटी रुपये अधिक उत्पन्न मिळाले आहे, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी वाढ
पिंपरी चिंचवड मनपाने मिळकत कराच्या माध्यमातून एक हजार कोटी रुपयांचं उद्दिष्ट आर्थिक वर्षासाठी ठेवले होते. परंतु या उद्दिष्टापर्यंत मनपा पोहचली नसली तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाने यंदा विक्रम केला आहे. मनपाने कर संकलनातून 810 कोटी रुपये उत्पन्न मिळवले आहे.महापालिकेच्या इतिहासातील आत्तापर्यंतचे हे सर्वाधिक उत्पन्न आहे.
गेल्या वर्षी महापालिकेने मिळकत कराच्या माध्यमातून 628 कोटी रुपये उत्पन्न मिळवलं होतं. यंदा त्यामध्ये 35 टक्के वाढ होत हे उत्पन्न 810 कोटीवर पोहोचले. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 182 कोटी रुपये अधिक उत्पन्न मिळवण्यात कर संकलन विभागाला यश आले. यावर्षी हजार कोटीचे उद्दिष्ट नक्की पूर्ण करू असा विश्वास कर संकलन विभागाने व्यक्त केला.
चोरीच्या दुचाकी देत होता स्क्रॅपमध्ये
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या 33 वर्षीय सुधीर कांबळे या आरोपीला सापळा रचून अटक केलीय.त्याच्याकडून 11 दुचाकी चोरीचे गुन्हे उघड झाले पोलिसांनी त्याच्याकडून सात दुचाकी हस्तगत केल्या आहेत. तो चोरीच्या दुचाकी स्क्रॅपसाठी देत असल्याचं चौकशीत समोर आले आहे.
पुणे, मुंबईकरांना शिंदे सरकारकडून मोठे गिफ्ट, काय होणार तुमचा फायदा…वाचा सविस्तर