Pimpri Chinchwad Municipal Corporation| पिंपरी चिंचवड महापालिकेचा 2022-23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर पाहा काय आहेत तरतूदी , विशेष उपक्रम एका क्लिकवर

आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेत यावेळीच्या अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची कर वाढ करण्यात आलेली नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 6 हजार 497 कोटी रूपयांचा अर्थसंकल्प सादर केला . महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील सुट्टीवर असल्याने अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी ऑनलाईन (online )पद्धतीनेही हा अर्थसंकल्प सादर केला

Pimpri Chinchwad Municipal Corporation| पिंपरी चिंचवड महापालिकेचा 2022-23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर पाहा काय आहेत तरतूदी , विशेष उपक्रम एका क्लिकवर
पिंपरी चिंचवड महानगरपालिकाImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 4:02 PM

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेचा 2022-23(Pimpri Chinchwad Municipal Corporation) या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प (Budget)स्थायी समितीत सादर आज करण्यात आला. आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेत यावेळीच्या अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची कर वाढ करण्यात आलेली नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 6 हजार 497 कोटी रूपयांचा अर्थसंकल्प सादर केला . महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील सुट्टीवर असल्याने अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी ऑनलाईन (online )पद्धतीनेही हा अर्थसंकल्प सादर केला. सन 2022-23 या आर्थिक वर्षात आरंभीच्या शिल्लकेसह 4 हजार 961 कोटी 65 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. यामध्ये मार्च 2023 अखेर 5 कोटी 2  लाख रुपये शिल्लक राहून प्रत्यक्ष खर्च4 हजार 956 कोटी 63  लाख रुपये अपेक्षित आहे. महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांसाठी 1 हजार 618 कोटी 68  लाख रुपये इतक्या भरीव रकमेची तरतूद अंदाजपत्रकात केली आहे. सन 2022-23  या आर्थिक वर्षात आरंभीच्या शिल्लकेसह 4 हजार 961  कोटी 65 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.

अर्थसंकल्पात विकास कामांसाठी भरीव निधीची तरतूद

महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांसाठी 1 हजार 618 कोटी 68 लाख रुपये इतक्या भरीव रकमेची तरतूद अंदाजपत्रकात केली आहे.

  • क्षेत्रीय स्तरावरील विकासकामांसाठी अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह या क्षेत्रीय कार्यालयांसाठी अनुक्रमे 28 कोटी 23 लाख, 8 कोटी 94 लाख,  19 कोटी 31 लाख, 7 कोटी 38 लाख, 6 कोटी 71 लाख, 12 कोटी 91लाख, 8  कोटी 20 लाख, 23 कोटी 46 लाख रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे.
  • शहरी गरिबांकरिता 1 हजार457 कोटी11 लाख रुपये, पाणीपुरवठा विशेषनिधीकरिता केलेली 200 कोटी रुपये,
  • महिलांसाठी॑च्या विविध योजनांसाठी 45  कोटी रुपये,
  • स्मार्ट सिटीकरिता 50 कोटी रुपये,
  • मेट्रो प्रकल्पासाठी 25 कोटी रुपये,
  • स्वच्छ भारत मिशनसाठी 10 कोटी रुपये,
  • दिव्यांग कल्याणकारी योजनांसाठी 44 कोटी रुपये, विविध नाविन्यपूर्ण विशेष योजनांसाठी 938 कोटी 38 लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे.

महापालिका या विशेष उपक्रमावर काम करणार

2022-23 या आर्थिक वर्षात महानगरपालिकेडून महत्वाचे उपक्रम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये शहरातील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी ‘पे ॲड पार्क ‘ योजनेतून दार केली जाणार आहे. ‘ तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्वच्छालये उभारून त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने त्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे. पिंपरी येथे दिव्यांगांसाठी कल्याणकारी केंद्र बांधणे, महिला बचत गटांसाठी संरचनात्मक ढाचा तयार करणे, शहरामध्ये वैद्यकीय सुविधांसह अत्याधुनिक डॉग पार्क विकसित करणे, महानगरपालिकेच्या वाहनांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करणे.

प्रकल्पांचा समावेश

सर्व प्रभागांत आणि विभागीय कार्यालयांमध्ये मल्टी नोडल पार्किंग स्लॉट विकसित करणे, शहरात विविध भागांत फूड कोर्ट विकसित करणे, कचऱ्याचे विलगीकरण सुनियोजित करण्यासाठी हस्तांतरण स्थानके विकसित करणे, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सिटी सेंटरचा विकास करणे, महानगरपालिकेची नवीन प्रशासकीय इमारत बांधणे, एमआयडीसी क्षेत्रामध्ये मटेरियल रिकव्हरी सुविधा उभारणे, उच्च कार्यक्षमता असलेले क्रीडा केंद्र सुरु करणे आदी महत्वपूर्ण उपक्रम, योजना आणि प्रकल्पांचा समावेश आहे.

Sangliमध्ये FRP, वीज कनेक्शन तोडणीविरोधात मोर्चा, Raju Shetti आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की

शेतीमालाच्या आधारभूत किंमतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ, काय आहे केंद्राचा अहवाल?

“एक वेडसर…” म्हणत उर्फी जावेदकडून ट्रान्स्फरंट ड्रेसमधला व्हीडिओ शेअर, चाहते म्हणाले…

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.